अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. चाहते आणि प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा २: द रुल’च्या टीझरने, गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अशातच या चित्रपटातील ‘अंगारों’ आणि मराठी गाण्याच्या मॅशअपने सगळ्यांना वेड लावलं आहे. अनेक मॅशअप सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी ‘अंगारों’ आणि निळू फुलेंच्या गाण्याच्या मॅशअपने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याच मॅशअपवर बॉलीवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळी जबरदस्त डान्स केला आहे.

सोशल मीडियावरील लोकप्रिय रॅपर, संगीतकार रोहित वाघमारेने काही दिवसांपूर्वी ‘अंगारों’ आणि निळू फुलेचं ‘आली ठुमकत, मान मुरडत’ या दोन गाण्यांचं मॅशअप केलं होतं. त्याचं हे मॅशअप सध्या चांगलंच व्हायरल झालं असून कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. एवढंच नव्हेतर निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले यांनी देखील रोहितने केलेल्या मॅशअपचं कौतुक केलं आहे. त्याच्या या मॅशअपवर आता अनेक जण रील करत आहेत.

हेही वाचा – “बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही”, ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम अभिजीत खांडकेकरची भावुक पोस्ट, म्हणाला, “अचानक एकेदिवशी…”

अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळीने ‘अंगारों’ आणि निळू फुलेचं ‘आली ठुमकत, मान मुरडत’ या दोन गाण्याच्या मॅशअपवर जबरदस्त डान्स केला आहे. “जर मला स्लो मो मध्ये डान्स करायचा असेल, तर मी स्लो मो मध्ये डान्स करेन”, असं कॅप्शन देत तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला असून या व्हिडीओला आतापर्यंत ६.८ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे प्राजक्ता डान्स पाहून श्रीवल्ली म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदानाही तिच्या प्रेमात पडली आहे. प्राजक्ताचा डान्स व्हिडीओ तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून कौतुक केलं आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये वडापाव गर्लसह झळकणार ‘ही’ लोकप्रिय इन्फ्लुएन्सर, मुनव्वर फारुकीशी होते खास संबंध

दरम्यान, अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांचा मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा २: द रुल’ येत्या १५ ऑगस्ट प्रदर्शित होणार आहे. पण काही दिवसांपासून प्रदर्शनाची तारीख बदलण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं आहे. एडिटिंग व फहाद फासिलचं काही चित्रीकरण बाकी असल्यामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.