अभिनेता प्रतीक बब्बर हा सध्या त्याच्या आगामी ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने तो अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे तसंच अनेक मुलाखतीही देत आहे. दरम्यान एका मुलाखतीत त्याने त्याची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि त्याच्यामध्ये केल्या जाणाऱ्या तुलनेबद्दल भाष्य केलं.

अभिनेता प्रतीक बब्बर यांनी आतापर्यंत अनेकदा त्याच्या आईबद्दल त्याला वाटणाऱ्या भावना या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अनेक मुलाखतींमधून समोर आणल्या आहेत. सुरुवातीपासूनच प्रतीकची तुलना त्याची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी होत आली आहे. या होणाऱ्या तुलनेबद्दल त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

आणखी वाचा : विक्रम गोखले यांना घरातूनच लाभला होता अभिनयाचा वारसा; वडील, आजी, पणजीही होते कलाकार

नुकतीच त्याने ‘नवभारत टाइम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला “तुझ्या आयुष्यात आतापर्यंत अनेक चढ-उतार आले, अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे, या सर्व काळात तुझा प्रेरणास्त्रोत कोणती व्यक्ती होती?” असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने ‘आई’ असं उत्तर देत अनेक गोष्टी मोकळेपणाने व्यक्त केल्या.

प्रतीक म्हणाला, “मला असं वाटतं की देव त्यांचीच परीक्षा घेतो जी व्यक्ती देवाला खूप आवडते. मी देवाला खूप आवडत असेन म्हणून आतापर्यंत मला अनेक कठीण परीक्षांना सामोरं जावं लागलं आहे. अशा काही परीक्षा मी आताही देत आहे आणि यापुढेही देत राहीन. या सर्व परीक्षांमध्ये मी नक्कीच विजयी होईन याची मला खात्री आहे. कदाचित या सर्व गोष्टींचा अनुभव घेणे माझ्यासाठी आवश्यक होते म्हणूनच आज मी इथवर पोहोचलो आहे. या परिस्थितींमुळे माझा आत्मवश्वास खूप वाढला आहे.”

पुढे तो म्हणाला, “या सगळ्यात माझी आई ही माझी प्रेरणाशक्ती राहिली आहे. तसंच माझ्या कामाबद्दल माझं असलेलं प्रेम, एक उत्तम अभिनेता आणि एक उत्तम माणूस बनण्याची माझी इच्छा ही माझ्या मला आलेल्या अनुभवांमुळे आजही कायम आहे. माझं कुटुंब, माझं ध्येय आणि स्वप्ने यांनी मला पुढे जाण्याचं प्रोत्साहन दिलं आहे. अनेकांनी मला नाकारले, आयुष्यभर अनेक गोष्टी सांगितल्या, मला त्या चुकीच्या सिद्ध करायच्या आहेत. त्या लोकांना चुकीचे कसे सिद्ध करायचे ही देखील माझ्यासाठी एक प्रकारची प्रेरणाच आहे.

हेही वाचा : “मी आयुष्याची वाट लावून घेतली होती त्याला आई जबाबदार…” प्रतीक बब्बरचा धक्कादायक खुलासा

“प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं एक उत्तम अभिनेता बनून सुपरहिट चित्रपट द्यावेत. एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट द्यावेत आणि पैसे कमवावेत, नाव कमवावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. पण माझं ध्येय वेगळं आहे. मला माझ्या आईकडून मिळालेला वारसा पुढे न्यायचा आहे. स्मिता पाटील यांचा मी मुलगा आहे या गोष्टीला मला न्याय द्यायचा आहे,” असं प्रतीकने सांगितलं.