अभिनेता प्रतीक बब्बर हा सध्या त्याच्या आगामी ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या भूतकाळातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याने काही वर्षांपूर्वी नशेच्या आहारी जाऊन त्याचे आयुष्याची वाट लावली होती आणि या परिस्थितीला त्याने त्याची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांना जबाबदार धरले होते असं तो म्हणाला.

‘आज तक’ने सूत्रांच्या अहवालाने दिलेल्या बातमीनुसार प्रतीकने एका मुलाखतीत सांगितलं, “‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटातील भूमिका मी माझ्या आईमुळे स्वीकारली. कारण तिचे अनेक चित्रपट मातीतले होते. आपल्या लोकांशी जोडलेले होते. मला माझ्या आईला माझ्या पद्धतीने श्रद्धांजली वहायची होती. अनेकदा माझी तुलना तिच्याशी केली जाते. मला त्या गोष्टीचं दडपण आहे. पण त्यामुळे मला उत्साह मिळतो आणि माझा आत्मविश्वास वाढतो. ही तुलना मला सतत जाणीव करून देते की मी एका प्रतिभावंत अभिनेत्रीचा मुलगा आहे. माझ्यासाठी तिच्या अभिनयाच्या जवळपास जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असेल.”

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी

आणखी वाचा : “अभिषेक-करिश्मा यांचं लग्न मोडलं कारण…” दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी २० वर्षांनी केला खुलासा

पुढे त्याने त्याच्या भूतकाळाबद्दलही भाष्य केलं आणि ते करत असताना त्याच्या अवस्थेला त्याची आई म्हणजे स्मिता पाटील यांना जबाबदार धरायचा असं त्याने सांगितलं. तो म्हणाला, “मला खूप राग येतो. त्या रागामुळेच माझं करिअर संपलं होतं. त्या रागामुळे मी माझं आयुष्याचीही वाट लावली होती. पण आता तो राग थोडा कमी झाला आहे. माझे आजी-आजोबा मला सोडून गेल्यापासून मी आपल्या मातीत, आपल्या लोकांशी हळूहळू जोडला गेलो.”

“मी माझ्या रागामुळे खूप काही सहन केलं आहे. मला सर्वात जास्त राग तेव्हा यायचा जेव्हा वाटायचं माझ्याजवळ मला मार्गदर्शन करायला, मी चूकतो कुठे चुकतो हे सांगायला माझी आई का नाहीये. मी काय करतोय याविषयी कोण बोलणार? मग मी आकाशाकडे एकटक बघत म्हणायचो, मी असा आहे कारण तू माझ्यासोबत नव्हतीस. तुझ्यामुळे मी स्वतःची ही अवस्था करुन घेतली. मी स्वतःलाच म्हणायचो की मी चुकीचा वागतो कारण माझी आई माझ्याबरोबर नाहीये. माझं बालपण इतर मुलांप्रमाणे नव्हतं,” असंही त्याने सांगितलं.

हेही वाचा : पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याआधीच अभिनेता प्रतीक बब्बर पुन्हा पडला प्रेमात, करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

दरम्यान मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात प्रतीक बब्बरबरोबर सई ताम्हणकर, श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट २ डिसेंबर रोजी ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.