scorecardresearch

बॉलिवूडमध्ये येणार आणखी एका चित्रपटाचा रिमेक! सलमान खान दिसणार मुख्य भूमिकेत?

शाहरुख खान पाहुणा कलाकार म्हणून दिसण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडमध्ये येणार आणखी एका चित्रपटाचा रिमेक! सलमान खान दिसणार मुख्य भूमिकेत?
bollywood actor

बॉलिवूडमध्ये सध्या रिमेकचा ट्रेंड पुन्हा बघायला मिळत आहे. ‘जरसी’, ‘बच्चन पांडे’ नुकताच प्रदर्शित झालेला ‘विक्रम वेधा’. दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी रिमेकवरून बॉलिवूडवर टीका होत असतेच. नुकताच ‘दृश्यम २’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. हा देखील ‘दृश्यम २’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. बॉलीवूडमध्ये आता आणखीन एक चित्रपटाचा रिमेक येणार आहे. मात्र यावेळी दाक्षिणात्य चित्रपट नसून एका कोरियन चित्रपटाचा हा रिमेक असणार आहे.

तीन वर्षांपूर्वी निर्माते अतुल अग्निहोत्री यांनी कोरियन चित्रपट ‘वेटरन’च्या रिमेकचे हक्क विकत घेतले. त्यावेळी सलमान खान या चित्रपटात झळकणार असल्याची बातमी आली होती. आत माध्यमांच्या अहवालानुसार सलमान खान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कोरियन चित्रपट ‘वेटरन’च्या हिंदी रिमेकमध्ये काम करणार आहे. लव्हयात्रीचे दिग्दर्शक अभिराज मिनावाला व्हेटरन हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार आहेत असं बोललं जात आहे. मात्र इंडिया टुडेच्या माहितीनीनुसार राजकुमार गुप्ता या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार आहेत.

अक्षय, आमिरच्या फ्लॉप चित्रपटांची कमाई विक्रम वेधापेक्षा जास्त! पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

इंडिया टुडेचा एका नव्या माहितीनुसार चित्रपटाबद्दल हिंदी रिमेकचे अधिकार निर्माते अतुल अग्निहोत्रीकडे आहेत.सलमान खान या चित्रपटात दिसणार नाही. वेटरन या कोरियन चित्रपटाचे दिग्दर्शन सेंग-वान यांनी केले होते तसेच ते लेखकदेखील होते. एक तरुण गुन्हेगार, गुप्तहेर या दोन प्रमुख पात्रांवर या चित्रपटाची कथा बेतली आहे. हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान सलमान खान ‘टायगर ३’ चित्रपटात कतरीना कैफबरोबर दिसणार आहे. मनीश शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात इमरान हाश्मीदेखील आहे आणि शाहरुख खान पाहुणा कलाकार म्हणून दिसण्याची शक्यता आहे. हा चित्रपट २१ एप्रिल २०२३ ईदीच्या दिवशी मोठ्या पडद्यावर येईल त्यानंतर, सलमान पूजा हेगडे आणि शहनाज गिलबरोबर ‘किसी भाई किसी की’ जानमध्ये दिसणार आहे. सलमान खान ‘गॉडफादर’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवीबरोबर झळकणार आहे

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या