Preity Zinta Net Worth and IPL Profit : बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अभिनयाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतही काम करीत आहेत. त्यांचा स्वत:चा व्यवसायही आहे. त्यापैकीच एक म्हणजे प्रीती झिंटा. प्रीती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी ९० च्या काळात अनेक बॉलीवूड चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिचा अभिनय, तिचं सौंदर्य यांमुळे ती अनेकांची आवडती अभिनेत्री होती. आजही तिची क्रेझ कायम आहे.
प्रीती फक्त अभिनय क्षेत्रापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर तिनं तिचा स्वत:चा व्यवसायही सुरू केला. प्रीती झिंटा आयपीएलमधील पंजाब किंग्ज या संघाची मालकीण आहे आणि तिची संपत्तीसुद्धा कोट्यवधींच्या घरात आहे. ती श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहे. प्रीती झिंटाची संपत्ती किती आहे, तिला क्रिकेटमधील तिच्या व्यवसायातून किती नफा होतो याबद्दल जाणून घेऊयात…
२००८साली प्रीती झिंटानं पंजाब किंग्जमध्ये केलेली कोट्यवधींची गुंतवणूक
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २००८ साली प्रीती इंडियन प्रीमियर लीग (IPL)जी मधील प्रमुख फ्रँचायजी पंजाब किंग्ज (PBKS)ची सह-मालक बनली. त्यासाठी तिनं ३५ कोटी रुपये गुंतवले. त्या वेळी त्या टीमची किंमत ७६ मिलियन डॉलर (६,२३२ कोटी रुपये) होती, जी आता वाढून ९२५ मिलियन डॉलर (७५,८५० कोटी रुपये) झाली आहे. टीमला फक्त प्रायोजकांद्वारेच नाही, तर लीगच्या तिकीटविक्रीतूनही मोठ्या प्रमाणात कमाई होते. या उत्पन्नातील सुमारे ८०% हिस्सा थेट टीमच्या मालकांच्या खात्यात जातो. ‘पंजाब किंग्स’मध्ये गुंतवणूक करण्याचा प्रीतीने घेतलेला निर्णय तिला आता मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देत आहे.
आयपीएलव्यतिरिक्त प्रीतीनं इतर काही गोष्टींमध्येही गुंतवणूक केली आहे. मुंबईतील पाली हिल्समध्ये तिचं एक आलिशान अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत १७ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. एबीपीच्या वृत्तानुसार लग्नानंतर प्रीती परदेशात स्थायिक झाली. पण, त्यानंतर तिनं तिच्या शहरात शिमलामध्ये सात कोटींचं घर खरेदी केलं. तिची एकूण संपत्ती उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार १८३ कोटी इतकी आहे.
माध्यमांच्याच वृत्तानुसार प्रीती जाहिरातींसाठीसुद्धा दीड ते दोन कोटी इतकं मानधन घेते. आता बऱ्याच दिवसांनंतर ती अभिनय क्षेत्रात पुनरागमन करीत आहे. ‘लाहौर १९४७’मधून ती बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटासाठी तिनं १० कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात तिच्यासह सनी देओल, आमिर खान, शिल्पा शेट्टी, शबाना आझमी हे कलाकार आहेत.
प्रीतीकडे आहे आलिशान गाड्यांचं कलेक्शन
प्रीतीला महागड्या आणि आलिशान गाड्यांची आवड असल्याचं दिसतं. तिच्याकडे महागड्या गाड्या आहेत. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार प्रीतीकडे मर्सिडीज-बेंझ GLS 350d, रेंज रोव्हर वोग, लेक्सस LX 470 या महागड्या गाड्या आहेत.
