Pritish Nandy : चित्रपट निर्माता, पत्रकार आणि कवी प्रीतीश नंदी यांचे बुधवारी (८ जानेवारी २०२४) निधन झाले. प्रीतीश नंदी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी पत्रकारिता, काव्य, आणि भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करीना कपूरने, दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या २००४ सालच्या ‘चमेली’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती, या चित्रपटाची निर्मिती प्रीतीश नंदी आणि त्यांच्या कन्या रंगिता यांच्या ‘प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्स’ प्रोडक्शन हाऊस अंतर्गत करण्यात आली होती. करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करत ‘चमेली’ चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये ती शॉट्सच्या दरम्यान प्रितीश नंदींबरोबर हसत-गप्पा मारताना दिसली. करीना कपूरने त्या फोटोंसह (हात जोडलेले इमोजी) वापरत पोस्ट केली.

हेही वाचा…Pritish Nandy : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि लेखक प्रीतीश नंदी यांचं निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘चमेली’चे दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनीदेखील त्यांच्या X हँडलवर प्रीतीश नंदी यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रीतीश नंदी यांनी सुधीर मिश्रा दिग्दर्शित २००३ सालचा ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. “प्रीतीश नंदी यांनी माझे आयुष्य बदलले. त्यांनी मला खूप काही शिकवले. माफ करा प्रीतीश नंदी , मी या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी कोणतीही कल्पना सादर करू शकलो नाही,” असे सुधीर मिश्रा यांनी लिहिले. 

संजय दत्तने संजय गुप्ता यांच्या २००२ सालच्या ‘कांटे’ या ऍक्शन थ्रिलर चित्रपटात आणि लीना यादव यांच्या २००५ सालच्या ‘शब्द’ या सिनेमात भूमिका साकारली होती, या दोन्ही चित्रपटांची निर्मिती प्रीतीश नंदी यांनी केली होती. संजय दत्तने त्याच्या X हॅण्डलवरून प्रीतीश नंदी यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने प्रीतीश नंदी यांचा फोटो शेअर करत लिहिले, “एक खरा सर्जनशील प्रतिभावंत आणि दयाळू व्यक्ती, तुमची खूप उणीव भासेल सर.” 

हेही वाचा…Aashiqui 3 चित्रपटातून ‘या’ अभिनेत्रीचा पत्ता कट? याआधीच्या बोल्ड भूमिका ठरल्या कारणीभूत

अनिल कपूर यांनीहे X वर प्रितीश नंदी यांच्या फोटोसह लिहिले, “माझ्या प्रिय मित्र प्रीतीश नंदी यांच्या निधनाने धक्का बसला आणि हृदयाला वेदना झाल्या. एक निर्भय संपादक, धाडसी व्यक्ती, आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेला माणूस.” 

प्रीतीश नंदी प्रसिद्ध पत्रकार होते. तर १९९० च्या दशकात त्यांनी दूरदर्शनवर ‘द प्रीतीश नंदी’ शो या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करत होते, ज्यामध्ये त्यांनी अनेक सेलिब्रिटींची मुलाखत घेतली.

हेही वाचा…Video: श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांचा लेकींबरोबरचा मजेशीर अंदाज पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल

चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत, नंदी यांनी २००० च्या दशकात ‘कांटे’, ‘झंकार बीट्स’, ‘चमेली’, आणि ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांनी आपल्या ‘प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्स बॅनर’खाली ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ आणि ‘मॉडर्न लव्ह मुंबई’ यांसारख्या वेब सिरीजचीही निर्मिती केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pritish nandy passes away sanjay dutt kareena kapoor and other bollywood celebrities pay heartfelt tributes psg