Priyanka Chopra On Surrogacy : बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकाने २०१८ मध्ये गायक निक जोनासशी लग्न केले. त्यानंतर २०२२ मध्ये प्रियांका-निक यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुड न्यूज दिली. त्यांनी आपल्या लेकीचं नाव मालती, असं ठेवलं आहे. प्रियांका लेकीबरोबरचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकत्याच एका मुलाखतीत प्रियांकानं मालतीच्या जन्मानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं, असं म्हटलं. तसेच मालतीच्या जन्मासाठी प्रियांकानं सरोगसीचा निर्णय का घेतला हेही सांगितलं.

“ती वाचेल की नाही, याचीही खात्री नव्हती”

मालतीच्या जन्माच्यावेळच्या कठीण दिवसांची आठवण सांगताना प्रियांका म्हणाली, “तिच्या जन्माच्या वेळी खूप अडचणी आल्या होत्या. २७ आठवड्यांतच ती जन्माला आली होती आणि १०० दिवसांपेक्षा जास्त काळ एनआयसीयू (निओनेटल इंटेंसिव्ह केअर युनिट) मध्ये राहिली. मालतीचा जन्म झाला तेव्हा मी ऑपरेशन थिएटरमध्येच होते. ती खूपच लहान होती; अगदी माझ्या हातापेक्षाही लहान. आम्ही दररोज तिच्याबरोबर वेळ घालवत होतो. त्यावेळी ती वाचेल की नाही, याचीही आम्हाला खात्री नव्हती.”

Award Banner

मालतीच्या जन्मावेळच्या कठीण दिवसांची आठवण सांगताना प्रियांका म्हणाली, “तिच्या जन्माच्या वेळी खूप अडचणी आल्या होत्या. २७ आठवड्यांतच ती जन्माला आली होती आणि १०० दिवसांपेक्षा जास्त काळ ती एनआयसीयू (निओनेटल इंटेंसिव्ह केअर युनिट)मध्ये राहिली. मालतीचा जन्म झाला तेव्हा मी ऑपरेशन थिएटरमध्येच होते. ती खूपच लहान होती; अगदी माझ्या हातापेक्षाही लहान. आम्ही दररोज तिच्याबरोबर वेळ घालवत होतो. त्यावेळी ती वाचेल की नाही, याचीही आम्हाला खात्री नव्हती.”

ती पुढे म्हणाली, “माझ्या लेकीचा जन्म हा माझ्यासाठी एक चमत्कारच आहे. तिचा जन्म झाल्यानंतर मला माझं सगळं आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटलं. मला अजूनही सतत भीती वाटत राहते.”

…म्हणून प्रियांकाने सरोगसीचा निर्णय घेतलेला

सरोगसीच्या मदतीनं आई झाल्यानंतर प्रियांकावर अनेकांनी टीका केली. त्याबद्दल २०२३ मध्ये Vogue ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकानं सरोगसीचा निर्णय का घेतला, याबद्दल सांगितलं होतं. ती म्हणालेली, “मला काही वैद्यकीय अडचणी होत्या आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. मला आनंद आहे की, मला हा पर्याय उपलब्ध होता.” टीका करणाऱ्यांना उत्तर देताना प्रियांका म्हणालेली, “मी काय सहन केलं आहे, ते तुम्हाला (ट्रोल करणाऱ्यांना) माहीत नाही. मी माझ्या किंवा माझ्या मुलीच्या वैद्यकीय परिस्थितीबद्दल कुणालाही सार्वजनिकपणे सांगू शकत नाही.”

तर ‘बॉलीवूड लाईफ’नं दिलेल्या एका वृत्तात असं म्हटलं होतं की, प्रियांकाला फर्टिलिटीबाबत कोणतीही समस्या नाही; पण आता तिचं वय ३९ आहे आणि त्यामुळे बाळ होणं ही तिच्यासाठी फार सोपी गोष्ट नाही. तसेच कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ही गोष्ट अधिक कठीण झाली असती. त्यामुळे अशा परिस्थितीत या जोडप्यानं सरोगसीचा मार्ग निवडला.

दरम्यान, प्रियांका अनेकदा मालतीबरोबरचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. ती अनेकदा मालतीला शूटिंगच्या सेटवरही घेऊन जाते. ‘The Bluff’ या चित्रपटाच्या शूटच्या मधल्या वेळेत प्रियांका मुलीची काळजी घेताना दिसली होती.

प्रियांका चोप्राचे आगामी कामाबद्दल…

प्रियांका नुकतीच The Bluff या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर लवकरच ती ‘वाराणसी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. हा चित्रपट एप्रिल २०२७ मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.