Priyanka Chopra California Wildfire Experience : प्रियांका चोप्रा अनेकदा कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या व्यावसायिक व खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलत असते. अशातच आता तिनं तिच्या आयुष्यातील एका कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.

आई-वडील आर्मीमध्ये डॉक्टर असल्यामुळे प्रियांका चोप्रा लहानपणी भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वाढली. सध्या ती लॉस एंजेलिसमध्ये तिचा नवरा गायक निक जोनस आणि मुलगी मालती यांच्याबरोबर रादते. काही वर्षांपासून प्रियंका लॉस एंजेलिसमधील राहते. मात्र, अलीकडेच तिने सांगितलं की गेल्या वर्षी कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या भीषण वणव्यांमुळे तिला खूप भीतीदायक दिवसांचा सामना करावा लागला होता.

प्रियांका चोप्राने सांगितला ‘तो’ अनुभव

प्रियांकानं यावेळी तिच्याकडे एक गो बॅग असल्यानं ज्यामध्ये संकटकालीन परिस्थितीत गरजेच्या गोष्टी भरता येतात. त्यावेळी तिला या बॅगेचं म्हत्तव कळलं. त्या कठीण प्रसंगाबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला आठवतंय तेव्हा मी माझ्या रूममध्ये उभी राहून विचार करत होते. निकसुद्धा त्यावेळी कामानिमित्त बाहेर होते. त्यामुळे त्यानंच मला ती बॅग भरायला सांगितलेली. पण, मी इतक्या गोष्टी त्या बॅगेत कशा भरू हा विचार करत होते. कितीतरी लोकांनी त्यावेळी त्यांचं आयुष्य गमावलं. त्यावेळी कशाला महत्त्व द्यायचं याची जाणीव झाली.”

प्रियांका पुढे म्हणाली, “त्यावेळी मी माझ्याबरोबर ज्या गोष्टी घेतल्या त्यांचं माझ्या लेखी खूप महत्त्व आहे. अर्थात, मी पासपोर्ट, जन्माचे दाखले आणि काही महत्त्वाची कागदपत्रं आदी बरोबर घेतलं. मी त्यावेळी अशा गोष्टी घेतल्या, ज्या पुन्हा मिळवता येणार नवहत्या.” वणवा पेटला त्यावेळची आठवण सांगत ती पुढे म्हणाली, “ते अगदी ज्वालामुखीसारखं वाटत होतं. आमच्या घराच्या मागच्या अंगणातून ते मला दिसत होतं. खूपच भयानक होतं. आमच्या घरातून डोंगर दिसतात आणि त्या डोंगरांना आग पूर्णपणे वेढून टाकताना मी पाहत होतं.”

प्रियांका चोप्रा तिच्या कामानिमित्त अनेकदा प्रवास करत असते. यादरम्यान ती अनेकदा भारत-अमेरिका असा प्रवासही करते. येत्या काळात प्रदर्शित होणाऱ्या तिच्या ‘वाराणसी’ या आगामी चित्रपटामुळे ती शूटिंगमध्ये व्यग्र असून, यानिमित्त अनेकदा तिचं भारतात येण-जाणं झालं असून, त्यामधून ती अनेक वर्षांनंतर भारतीय चित्रपटातही काम करत आहे.

‘वाराणसी’ या चित्रपटातून महेश बाबू व प्रियांका पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक राजामौली याचं दिग्दर्शन करत आहेत. २०२७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.