Priyanka Chopra in Amritsar: ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी भारतात दाखल झाली आहे. ऑस्कर सोहळ्यातील ग्लॅमरस उपस्थितीनंतर प्रियांकाने थेट अमृतसर गाठले. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात प्रियांकाने कडेकोट सुरक्षेत दर्शन घेतले. डोक्यावर ओढणी आणि साध्या पेहरावात आलेल्या प्रियांकाने चाहत्यांना अभिवादन केले. मात्र, सर्वांचे लक्ष वेधले ते तिने केलेल्या सेवेने. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा इतर महिलांबरोबर जमिनीवर बसून भांडी घासताना दिसत आहे.
प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्कर सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून हजेरी लावणाऱ्या प्रियांका चोप्राचा अमृतसहमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रियांका चोप्रा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ती कडेकोट सुरक्षेत मंदिरात जाताना दिसत आहे.
प्रियांका चोप्राने डोक्यावर ओढणी घेतली होती. यावेळी तिने तिच्या चाहत्यांना अभिवादन केले. मंदिरात चाहते तिच्याभोवती जमा झाले आणि गर्दी केली. काही तिच्या मागे चालू लागले. या व्हिडीओमध्ये, फोटो काढण्यासाठी जवळ आलेल्या एका चाहत्याबरोबर पोज देण्यासाठी ती काही क्षण थांबतानाही दिसते.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये, प्रियांका चोप्रा जमिनीवर बसून सेवा करताना दिसत आहे. तिने मंदिरातील इतर महिलांबरोबर भांडी घासली. सुवर्ण मंदिरातील परंपरेनुसार, तिने इतर महिलांसोबत मिळून तेथील भांडी घासली आणि सेवेत सहभाग घेतला.

बॉलीवूड सोडून हॉलीवूडला का गेली प्रियांका चोप्रा?
हॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रियांकाने नुकतेच तिच्या करिअरबद्दल भाष्य केले. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिने इंडस्ट्री का सोडली, त्यामागचं कारण सांगितलं.
ती म्हणाली, “भारतात काम करताना मला थोड्या मर्यादा जाणवू लागल्या होत्या. मला जगभरात अजून काय काय आहे, हे पाहायचं होतं. कोणताही प्रवास सोपा नसतो. प्रत्येकाला आपापला संघर्ष करावा लागतो. मला एकाच गोष्टीत अडकून राहायला आवडत नाही. जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, तेव्हा आपण स्वतःला सावरून पुन्हा उभं राहिलं पाहिजे. थोडा वेळ दु:खी राहिल्यानंतर पुढे जाणं आवश्यक आहे. मी माझ्या करिअरमध्ये अनेकदा असं केलं आहे.”
