scorecardresearch

प्रियांका चोप्राने ३०व्या वर्षी केलेले Eggs Freeze; आता खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईने…”

प्रियांका चोप्रा व निक जोनस २०२२ मध्ये सरोगेसीद्वारे पालक झाले.

priyanka chopra froze eggs
प्रियांका चोप्रा व तिची आई मधू चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने तिने डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट शो ‘आर्मचेयर एक्सपर्ट’मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. तिने बॉलिवूड सोडण्यापासून ते निक जोनासशी लग्न व एग्ज फ्रीझ करण्याबद्दलही भाष्य केलं.

“इथल्या राजकारणाला…” प्रियांका चोप्राचा हिंदी सिनेसृष्टीवर गंभीर आरोप

प्रियांका चोप्रा म्हणाली, “मी माझ्या ३० व्या वर्षी बीजांड गोठवून (Eggs Freeze) घेतले होते. हे केल्यावर मला खूप दिलासा मिळाला आणि मी माझ्या भविष्यातील करिअरच्या महत्त्वाकांक्षा आणि लग्नाबद्दल निश्चिंत झाले. मला मुलं हवी होती कारण मला मुलं खूप आवडतात. पण, मला माझ्या करिअरवरही लक्ष केंद्रित करायचं होतं आणि मोठं यश मिळवायचं होतं. अशा परिस्थितीत वाढत्या वयाचा माझ्या बीजांडांच्या वाढीवर परिणाम होईल. पण बीजांड गोठवल्याने मला खूप फायदा झाला. कारण बीजांड गोठवल्यानंतर ते तसेच राहतात. मला मुलं हवी होती म्हणून मी ते केलं.”

“चांगल्या कामासाठी काही लोकांना आकर्षित…” बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जाण्याबद्दल स्पष्टच बोलली प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली, “माझ्या आईने मला समजावून सांगितले की ३५ वर्षांच्या वयानंतर मुलं होण्यात अडचण येते. विशेषत: त्या महिलांना जास्त अडचणी येतात, ज्यांना रोज सतत काम करावे लागते. पण विज्ञानाचा चमत्कार असा आहे की काहीही शक्य आहे. त्यामुळे मी लोकांना असं सांगते की एखाद्या सणाला तुम्ही कार खरेदी करू नका, महागड्या भेटवस्तू खरेदी करू नका आणि हे काम करा. तुमचे बीजांड गोठवून तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे काम करू शकता आणि हवी तेव्हा मुलं जन्माला घालू शकता.”

दरम्यान, प्रियांका चोप्राने अमेरिकन पॉप गायक निक जोनासशी लग्न केलंय. सध्या ती अमेरिकेतच राहते. प्रियांका व निक २०२२ मध्ये सरोगेसीद्वारे पालक झाले. त्यांच्या मुलीचं नाव मारी मालती आहे. ते दोघेही मुलीबरोबर फिरताना आणि वेळ घालवताना दिसतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 08:18 IST

संबंधित बातम्या