scorecardresearch

Premium

Video: “परिणीतीला काय गिफ्ट दिलं?” खुलासा करत प्रियांका चोप्राची आई म्हणाली, “त्यांच्या लग्नात…”

मधु चोप्रा आणि परिणीती चोप्रा एकमेकांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी परिणीतीला लग्नाचं काय खास गिफ्ट दिलं हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक होते.

madhu chopra

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा नुकतेच विवाह बंधनात अडकले. २४ सप्टेंबरला राजस्थानमधील उदयपूर येथे परिणीती आणि राघव यांच्या शाही लग्न सोहळा संपन्न झाला. तर आता त्यांच्या लग्नात प्रियांका चोप्रा हिच्या आईने काही खास भेटवस्तू दिली का, याचा खुलासा स्वतः त्यांनी केला आहे.

परिणीती आणि राघव यांच्या लग्नाला त्यांचे जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. परिणीतीचे मोठी चुलत बहिण प्रियांका चोप्रा कामानिमित्त तिच्या या शाही विवाह सोहळा उपस्थित राहू शकली नाही. मात्र तिची आई मधु चोप्रा या लग्नाला आवर्जून उपस्थित होत्या.

kamal-haasan-suicidal thoughts
कमल हासन यांच्याही डोक्यात आलेला आत्महत्येचा विचार; तरूणांशी संवाद साधताना अभिनेत्याचा मोठा खुलासा
Akshara Mangalsutra
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये रंगणार राजेशाही विवाह सोहळा, अक्षराने घातलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya-sule-khupte-tithe-gupte
‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर सुप्रिया सुळे झाल्या भावूक; नव्या एपिसोडचा प्रोमो चर्चेत

आणखी वाचा : “ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

मधु चोप्रा आणि परिणीती चोप्रा एकमेकांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी परिणीती आणि तिच्या कुटुंबीयांना लग्नाचं काय खास गिफ्ट दिलं हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक होते. तर आता भेटवस्तूबद्दल मधु चोप्रा यांनी भाष्य केलं आहे. विवाह सोहळ्यानंतर परतताना विमानतळावर त्यांनी पापारझींशी संवाद साधला. त्यावेळी गिफ्टबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या, “मी परिणीती आणि तिच्या कुटुंबीयांना काहीही खास भेटवस्तू दिलेली नाही. त्यांनी भेटवस्तू घेण्यास नकार दिला होता. त्यांनी या लग्नात गिफ्टची कोणतीही देवाण-घेवाण केली नाही. त्यामुळे माझे आशीर्वाद हीच मी त्यांना दिलेली मोलाची भेट आहे.”

हेही वाचा : राघव-परिणीतीच्या लग्नाचा शाही थाट! विवाहस्थळ असलेलं ‘द लीला पॅलेस’ पाहिलंत का? भाडं तब्बल…

तर आता मधु चोप्रा यांचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. तर आता या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka chopra mother madhu chopra revealed what gift she gave to parineeti chopra rnv

First published on: 26-09-2023 at 18:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×