Premium

प्रियांका चोप्राच्या आईने शेअर केला परिणीती-राघवच्या लग्नातील Unseen फोटो, म्हणाल्या…

प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रांनी शेअर केला परिणीतीच्या लग्नातील खास फोटो…

priyanka chopra mother madhu chopra shares unseen picture
मधु चोप्रांनी शेअर केला परिणीतीचा गोड फोटो

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा शाही विवाहसोहळा २४ सप्टेंबरला उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये पार पडला. या जोडप्याच्या लग्नाला बॉलीवूड सेलिब्रिटी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. सानिया मिर्झा, हरभजन सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार संजय सिंह, आदित्य ठाकरे आदी मंडळी राघव-परिणीतीच्या लग्नात सहभागी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “हे माझं स्वप्न नव्हतं, पण…”, ऋतुजा बागवेने सांगितलं नवीन घर खरेदी करण्याचं कारण, म्हणाली…

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राला काही कारणास्तव चुलत बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहता आले नाही. परंतु, तिची आई मधु चोप्रा या लग्नाला गेल्या होत्या. त्यांनी परिणीतीच्या लग्नातील एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस घातल्याचं दिसत आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने नाश्ताला उपमा, पोहे नाही तर खाल्ला ‘हा’ पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाली…

मधु चोप्रा यांनी शेअर केलेला फोटो परिणीती चोप्राच्या चुडा भरण्याच्या समारंभातील आहे. “चुडा भरून तयार झालेली आमची आनंदी नववधू” असं कॅप्शन प्रियांकाच्या आईने या फोटोला दिलं आहे. मधु चोप्रानी शेअर केलेला परिणीतीचा Unseen फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वी अभिनेत्री सानिया मिर्झाने सुद्धा परिणीतीच्या लग्नातील आकर्षक रुमालाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

हेही वाचा : “दारूचं व्यसन, सलग फ्लॉप चित्रपट अन्…”, आलियाने सांगितला वडील महेश भट्ट यांचा संघर्ष; म्हणाली, “माझी आई…”

परिणीती चोप्रा

दरम्यान, कॉलेजमध्ये असताना परिणीती आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट झाली होती. परंतु, त्यांच्या प्रेम कहाणीला २०२२ पासून सुरूवात झाली. परिणीतीच्या ‘चमकीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची पुन्हा भेट झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka chopra mother madhu chopra shares unseen picture of parineeti chopra from her choora ceremony sva 00

First published on: 01-10-2023 at 16:33 IST
Next Story
‘या’ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे शाहरुख खानचा ‘डंकी’? सोशल मीडियावर होतोय ट्रोल