Priyanka Chopra : देसी गर्ल प्रियांका चोप्राने तिच्या अभिनयाचा डंका बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये गाजवला आहे. प्रियांकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. तिच्या यशाचे आई मधु चोप्रा या नेहमी कौतुक करतात. त्या कायम मुलगी प्रियांकाचा त्यांना किती अभिमान आणि गर्व वाटतो याबद्दल सांगत असतात. असे असले तरी मधु चोप्रा यांच्या मनात एक खंत आहे. मुलीसाठी त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे आजही त्या अस्वस्थ असून काहीवेळा त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळतात, असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
रॉड्रिगो कॅनेलसबरोबर ‘समथिंग बिगर टॉक’ शोमध्ये मधु चोप्रा यांनी मुलीच्या बालपणीची एक आठवण सांगितली आहे. त्यांनी सांगितलं, “माझी मुलगी फक्त सात वर्षांची होती, तेव्हा मी तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं होतं. तिच्या आयुष्यात ती फार पुढे जावी, तिने मोठी प्रगती करावी म्हणून त्यावेळी मी हा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे मी एक स्वार्थी आई ठरले का ते मला माहिती नाही. मात्र, या निर्णयासाठी माझ्या मनात खेद आणि अभिमान दोन्ही भावना आहेत. त्यावेळी प्रियांकाच्या मनाची अवस्था आठवून मला आजही रडू येते.”
हेही वाचा : ‘पुष्पा २’ चित्रपटात दिसणार नाहीत ‘हे’ सीन; सेन्सॉर बोर्डाने बदल करण्याच्या दिल्या सूचना
अशोक चोप्रा यांनी वर्षभर पत्नीबरोबर धरला होता अबोला
मधु चोप्रा यांनी मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, “प्रियांका आमची सर्वात लाडकी मुलगी आहे. ती आधीपासूनच फार हुशार आहे. तिच्या प्रगतीसाठी मी तिला लखनऊच्या ‘ला मार्टिनियर स्कूल’मध्ये पाठवले होते. माझ्या निर्णयाला प्रियांकाच्या बाबांचा (अशोक चोप्रा) विरोध होता. मात्र, तरीही मी मुलीला त्या शाळेत पाठवले. ती फक्त सात वर्षांची होती. माझा निर्णय मान्य नसल्याने अशोक चोप्रा यांनी माझ्याबरोबर वर्षभर अबोला धरला होता.”
“पहिल्या दिवशी मी प्रियांकाला घेऊन शाळेत गेले त्यावेळी पुढे काही वर्षे येथेच रहायचे आहे, हे तिला माहिती नव्हते. काही वेळाने सूचना आली आणि सर्व पालकांना जाण्यास सांगितले. मी निघाले त्यावेळी प्रियांका मला म्हणाली तू का चालली आहेस, तू मला घेऊन जाणार नाही का? त्यावर मी तिला सांगितले, ही तुझी नवीन मोठी शाळा आहे. तुला इथे छान मित्र- मैत्रिणी मिळतील. प्रियांकाला त्या ठिकाणी राहणे फार कठीण जात होते. तिला भेटण्यासाठी मी प्रत्येक शनिवारी तिच्या शाळेत जायचे. माझ्या या निर्णयाचा मलाही फार त्रास होत होता. मात्र, प्रियांकाने सर्व काही जुळवून घेतले”, असे मधु यांनी पुढे सांगितले आहे.
हेही वाचा : कीर्ती सुरेशच्या घरी यंदा सनई चौघडे वाजणार; स्वत: सांगितलं लग्नाचं ठिकाण
प्रियांकाच्या आई मधु यांनी तिला प्रत्येक प्रसंगात साथ दिली आहे. चित्रपटाच्या शूटिंगवेळी त्या कायम तिच्याबरोबर असतात. प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासबरोबर लग्न केले. या दोघांना मालती नावाची एक मुलगी आहे. बॉलीवूड गाजवल्यानंतर प्रियांका आता हॉलीवूडमध्ये तिच्या करिअरमध्ये यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
द