बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यग्र आहे. त्यानिमित्ताने प्रियांकाने दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यासह बॉलिवूड सोडण्यामागच्या कारणांचा खुलासाही केला आहे. प्रियांकाने निक जोनसला डेट करण्यापूर्वीच्या तिच्या एका रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे.

प्रियांका चोप्राने ३०व्या वर्षी केलेले Eggs Freeze; आता खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईने…”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

२०१६ मध्ये निक जोनासने पहिल्यांदाच प्रियांका चोप्राला ट्विटरवर मेसेज केला होता. निकने सोशल मीडियावर डायरेक्ट मेसेज करून तिचा नंबर मागितला होता. तेव्हा प्रियांका दुसऱ्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तिला त्यावेळी निकशी बोलण्यात फारसा रस नव्हता. प्रियांका म्हणाली, “त्यावेळी मी रिलेशनशिपमध्ये असल्याने मला त्याचं प्रपोजल स्वीकारायचं नव्हतं. मी खूप काळापासून सिरीअस रिलेशनशिपमध्ये होते. ते जवळपास सहा वर्षे चाललेलं रिलेशनशिप होतं. परंतु २०१६ मध्ये निक मला खूप मेसेज करत होता, मग आम्ही एकमेकांशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. माझ्या आयुष्यात निकची एंट्री होण्याआधी मी माझ्या पूर्वीच्या रिलेशनशिपच्या अंतिम टप्प्यात होते.”

“इथल्या राजकारणाला…” प्रियांका चोप्राचा हिंदी सिनेसृष्टीवर गंभीर आरोप

प्रियांकाला तिचे मित्र आणि निकला त्याचा भाऊ केविन जोनास यांनी एकमेकांना भेटण्यास सांगितलं. त्यानंतर दोघेही भेटले, प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी २०१८ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना मालती मेरी नावाची मुलगी आहे, तिचा जन्म २०२२ मध्ये झाला होता.

Story img Loader