प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे मनोरंजनसृष्टीतील सर्वात लोकप्रिय लोकप्रिय जोडपे आहे. सोशल मीडियावर या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. ते दोघं सोशल मीडियावरून नेहमीच एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करताना दिसतात, एकमेकांच्या कामांमध्ये एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. आता अशातच निक जोनसच्या एका चाहतीचा आणि प्रियांकाचा एक व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

प्रियांका चोप्राप्रमाणेच निक जोनसचाही चाहतावर्ग खूप मोठा आहे. जगभरात त्याचे चाहते पसरले आहेत. ते निकबद्दल विविध मार्गांनी प्रेम व्यक्त करत असतात. अनेकदा निकच्या चाहत्या कॉन्सर्टमध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया देताना दिसतात. तर आता त्याच्या एका चाहतीने थेट प्रियांकालाच “मला निकशी लग्न करायचं होतं.” असं म्हटलं.

आणखी वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

प्रियांका आणि निकच्या चाहतीचा हा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये प्रियांका निक जोनसची कॉन्सर्ट पहिल्या रांगेतून ऐकताना दिसत आहे. इतक्यात निकची एक चाहती येते आणि प्रियांकाला म्हणते, “मला तुला सांगायचं आहे की मी खरंच विचार केला होता की मी निक जोनसशी लग्न करेन. पण तू त्याच्याशी लग्न केलंस याचा मला आनंद आहे.” चाहतीचं हे बोलणं ऐकून प्रियांकालाही हसू येतं. तिला उत्तर देत प्रियांका म्हणते, “मलाही या गोष्टीचा खूप आनंद आहे की मी असं केलं.”

हेही वाचा : “त्या धर्माविषयी खूप…,” निक जोनासने पहिल्यांदाच त्याच्या व पत्नी प्रियांका चोप्राच्या धर्माबाबत केलं भाष्य

आता त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. तर त्यावर कमेंट करत त्या दोघांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्या चाहतीच्या हिमतीला दाद दिली. तर अनेकांनी प्रियांकाने दिलेल्या उत्तराचं आणि तिच्या नम्रपणाचं खूप कौतुक केलं.

Story img Loader