scorecardresearch

Premium

… म्हणून प्रियांका चोप्रा फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मधून पडली बाहेर, खरं कारण आलं समोर

काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने या चित्रपटातून माघार घेतली. तर आता याचं कारण समोर आलं आहे.

Priyanka Chopra

‘जी ले जरा’ या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. चित्रपटातून अभिनेत्री कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याची घोषणा दिग्दर्शक फरहान अख्तरने केली होती.  या तिघी दमदार अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार असल्याने प्रेक्षकही खूप उत्सुक होते. पण काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने या चित्रपटातून माघार घेतली. तर आता याचं कारण समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच जी ले जरा या चित्रपटाला प्रियंका चोप्राने नकार दिल्याचं समोर आलं. त्यानंतर तिच्या या एक्झिटची बरीच चर्चा रंगली. प्रियांका चोप्राला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नाही आणि त्यावरून तिचे दिग्दर्शक निर्मात्यांची मतभेद झाल्यामुळे ती या चित्रपटातून बाहेर पडली असं बोललं जात होतं. पण आता या मागचं खरं कारण समोर आलं आहे.

kranti redkar and sameer wankhede twins daughter face reveal
Video: अखेर क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींची पहिली झलक समोर; अभिनेत्रीने शेअर केला गोड व्हिडीओ
Dharmendra Reaction on bobby deol look from animal movie
Video: ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात बॉबी देओलचा जबरदस्त लूक, वडील धर्मेंद्र यांनी व्हिडीओ शेअर करत दिली प्रतिक्रिया
bollywood actress parineeti chopra
Video: परिणीती चोप्रा पापाराझींवर भडकली; हात जोडून म्हणाली, “मी तुम्हाला…”
After announcing separation from Joe Jonas Sophie Turner kisses co-star on sets
घटस्फोटाच्या घोषणेनंतर ‘या’ अभिनेत्याला किस करताना दिसली प्रियांका चोप्राची जाऊबाई, Video Viral

आणखी वाचा : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी केला गेला होता प्रियांका चोप्राच्या नावाचा विचार, कारण वाचून व्हाल थक्क

‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार, प्रियांकाने या चित्रपटातून माघार घेण्याचं खरं कारण हे शेड्युल आहे. पुढील काही महिन्यातील प्रियांकाचं वेळापत्रक खूप व्यग्र आहे. प्रियांकाबरोबरच आलिया आणि कतरिनाही आपापल्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे त्यांना या चित्रपटासाठी एकत्र तारखा देता येत नाहीयेत. म्हणून या चित्रपटाचा शूटिंग लांबणीवर जात आहे. चित्रपटाचे शूटिंग रखडल्यामुळे प्रियांकाने या चित्रपटाला नकार दिला आहे.

हेही वाचा : काय सांगता! प्रियांका चोप्राच्या लेकीच्या हातात महागडी पर्स, किंमत वाचून व्हाल थक्क

दरम्यान, आता प्रियांकाच्या जागी या चित्रपटामध्ये कोण अभिनेत्री दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा चित्रपट फिरायला गेलेल्या तीन मैत्रिणींवर आधारित आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka chopra said no to jee le zara movie because of schedule of the film rnv

First published on: 03-10-2023 at 18:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×