scorecardresearch

प्रियंका च्रोपाने चिमुकल्या लेकीला दिल्या मेकअप टिप्स? फोटो शेअर करत म्हणाली…

प्रियंका च्रोपाने मुलगी मालतीबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत.

Priyanka Chopra and her daughter Malti
प्रियांका चोप्राने मुलगी मालतीबरोबर शेअर केला क्यूट फोटो

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाने चोप्राने २०१८ मध्ये हॉलिवूड अभिनेता-गायक निक जोनासशी लग्न केले. या जोडप्याने जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे त्यांची मुलगी मालती मेरीचे स्वागत केले. प्रियांकाने यावर्षी जानेवारी महिन्यात तिची लाडकी मुलगी मालती मेरीचा चेहरा दाखवला होता. आता प्रियांकाने आपल्या चिमुकल्या लेकीबरोबर एक क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहते भरभरून कमेंट करताना दिसत आहेत.

हेही वाचा- “चांगल्या कामासाठी काही लोकांना आकर्षित…” बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जाण्याबद्दल स्पष्टच बोलली प्रियांका चोप्रा

प्रियंका अनेकदा तिच्या लहान मुलीचे गोंडस फोटो आणि अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्रियांकाने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिच्या मुलीसोबतचे गोड क्षण शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा तिचा मेकअप करताना दिसत आहे. कामाच्या असाइनमेंटसाठी ती तयार होत आहे. तर, मालती मेरी तिच्या आईच्या मांडीवर बसून तिचे ग्लॅमरस लूक पाहताना दिसत आहे. फोटो पाहताना असं वाटतयं की छोटी मालती तिची आई प्रियांकाकडून मेकअप टिप्स घेत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत.

सध्या प्रियांका अनेक चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. अॅमेझॉन प्राइमच्या स्पाय थ्रिलर मालिका ‘सिटाडेल’ आणि ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ या रोमँटिक कॉमेडीमध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे. बॉलिवूडमध्येही प्रियंका पुनरागमन करणार आहे. ती ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान अख्तर दिग्दर्शित या प्रोजेक्टमध्ये प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 11:04 IST

संबंधित बातम्या