विकेंड साजरा करताना प्रियांका आणि निकची झाली होती ‘अशी’ अवस्था; व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “जेव्हा आई-बाबा..”

बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

priyanka and nick
प्रियंका आणि निक जोन्स

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दिवसभरातील घडामोडींचे फोटो शेअर करत ते चाहत्यांशी सतत जोडलेले असतात. मात्र, व्यस्त वेळापत्रकामुळे दोघ एकमेकांबरोबर तसेच आपली मुलगी मालतीलाही वेळ देऊ शकत नाहीत. मात्र, प्रियंकाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विकेंड साजरा करताना दिसत आहे. मात्र, प्रियंका आणि निकची अवस्था बघून चाहते व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा- “झुकेगा नही हा संवाद नव्हता…” ‘पुष्पा’ चित्रपटाबद्दल श्रेयस तळपदेचा मोठा खुलासा; म्हणाला…

आई-वडील झालेले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास शनिवारी रात्री एन्जॉय करण्यासाठी घरातून बाहेर पडले आणि एका रेस्टॉरंटमध्ये गेले. प्रियंकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कंटाळलेली आणि थकलेली दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत प्रियांकाने लिहिले की, “जेव्हा आई आणि बाबा शनिवारी रात्री एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात.” हा व्हिडिओ शेअर करताना प्रियांकाने तिच्या पतीला टॅग करत हसणारा इमोजीही जोडला आहे.

प्रियंका चोप्राने २०१८ साली गायक निक जोनाससोबत लग्न केले. गेल्या वर्षीच अभिनेत्रीने आपली मुलगी मालतीचे सरोगसीच्या माध्यमातून जगात स्वागत केले होते. आई होण्याचे कर्तव्य ही अभिनेत्री अतिशय चोखपणे पार पाडत आहे. तिच्या मुलीसोबत हँग आउट करण्यापासून तिच्यासोबत क्वालिटी टाइम घालवण्यापर्यंत प्रियंका सोशल मीडियावर अनेकदा आईला गोल करताना दिसत आहे.

हेही वाचा- ‘बजरंगी भाईजान’च्या सीक्वलची चर्चा; सलमानबरोबर करीना नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री दिसू शकते मुख्य भूमिकेत

प्रियांका चोप्रा लवकरच ‘सिटाडेल’ मध्ये दिसणार आहे. ही नाटक मालिका २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रियंका मुख्य भूमिकेत असून ती नादियाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत रिचर्ड मॅडेनही मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्री शेवटची मॅट्रिक्समध्ये दिसली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 16:37 IST
Next Story
‘बजरंगी भाईजान’च्या सीक्वलची चर्चा; सलमानबरोबर करीना नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री दिसू शकते मुख्य भूमिकेत
Exit mobile version