Priyanka Chopra Shared A Post : प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील आणि कामासंदर्भातील अपडेट्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्रियांका परदेशात राहत असली, तरी ती अनेकदा भारतात घडणाऱ्या घडामोडींबद्दल, हिंदी चित्रपटांबद्दल आणि सेलिब्रिटींबद्दल प्रतिक्रिया देताना दिसते.
प्रियांकाने बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर हॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तिथेही तिच्या अभिनयाने अनेकांची पसंती मिळवली. गेली अनेक वर्षे ती बॉलीवूडमध्ये काम करत नसली, तरी इंडस्ट्रीतील विविध गोष्टींबद्दल ती तिची मतं व्यक्त करत असते. अशातच अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. यावेळी तिने सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या एका चित्रपटातील फोटोही शेअर केला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली.
प्रियांकाने शेअर केला ‘हम दिल दे चुके सनम’मधील फोटो
सलमान आणि ऐश्वर्या राय यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे आजही अनेक चाहते आहेत. आजही अनेक जण या ऑनस्क्रीन जोडीचे चित्रपट आवडीने पाहतात. प्रियांकाने शेअर केलेला हा फोटो संजय लीला भन्साळी दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ मधील आहे. त्यामुळे परदेशात राहत असली, तरी प्रियांका हिंदी चित्रपट पाहत असते, हे यातून दिसते.
प्रियांकाच्या लेटेस्ट पोस्टमध्ये तिने माधुरी दीक्षितच्या चित्रपटातील फोटोही शेअर केला आहे. याशिवाय तिने दैनंदिन आयुष्यातील आणि जवळच्या लोकांसोबतचे काही खास फोटोही पोस्ट केले आहेत. तसेच परदेशात जाऊन स्थायिक झालेल्या आणि स्वतःची स्वप्नं पूर्ण करणाऱ्या महिलांसाठी तिने एक खास नोट लिहिली आहे. अभिनेत्री म्हणाली, “त्या सर्व महिलांसाठी, ज्या अनोळखी देशात जाऊन स्थायिक झाल्या. कुठलाही पाठिंबा नसताना, कोणतीही शाश्वती नसताना, अनेक आव्हानांना सामोरं जातानाही चेहऱ्यावर हसू ठेवून जिद्दीने स्वतःची स्वप्नं पूर्ण केली. त्यामुळे कोणालाही तुमच्या मेहनतीला कमी लेखू देऊ नका.”
दरम्यान, प्रियांका चोप्रा अनेक वर्षांनंतर भारतीय चित्रपटातून येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक यांच्या आगामी चित्रपटातून ती महेश बाबूबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. २०२७मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांमध्ये याबद्दल खूप उत्सुकता आहे.
