प्रियांका चोप्राची चुलत बहीण अभिनेत्री मीरा चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात लग्नाआधीच्या सर्व सोहळ्यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. मीरा राजस्थानमधील जयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या होणाऱ्या पतीचं नाव रक्षित केजरीवाल आहे. मीरा चोप्रा ही सुदेश व नीलम चोप्रा यांची लेक आहे. ती रक्षित केजरीवालशी जयपूरमध्ये १२ मार्च रोजी लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाच्या विधींना मेहेंदीपासून सुरुवात होईल. मेहेंदी समारंभ ११ मार्च रोजी संध्याकाळी होईल, संगीत व कॉकटेल ११ मार्चला संध्याकाळी सात वाजता सुरू होईल, त्यांचा हळदी समारंभ १२ मार्चला सकाळी १० वाजता होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता हे जोडपं लग्नबंधनात अडकेल. https://www.instagram.com/p/C3W9IKLImh4/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== “तुम्हाला आमचे वडील म्हणणं…”, नितीश भारद्वाज यांनी सांगितली मुलीची प्रतिक्रिया; तिसऱ्या लग्नाबद्दल म्हणाले, “मी…” मीरा चोप्रा व रक्षित यांच्या लग्नाचे सर्व विधी बुएना व्हिस्टा लक्झरी गार्डन स्पा रेसॉर्टमध्ये होणार आहेत. मीराची ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चाहते तिला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. मीरा ही परिणीती व प्रियांका चोप्रा यांची चुलत बहीण आहे.