Priyanka Chopra Skin Care Routine: प्रियांका चोप्राने बॉलीवूडमध्ये ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट २००३ ला प्रदर्शित झाला होता. २००३ ला प्रदर्शित झालेल्या अंदाज या चित्रपटातून तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
‘बर्फी’, ‘फॅशन’, ‘सात खून माफ’, ‘ऐतराज’, ‘फॅशन’, ‘मेरी कोम’, ‘कमिने’, ‘डॉन’, दोस्ताना, अग्नीपथ, दिल धडकने दो, अग्नीपथ, क्रिश, मुझसे शादी करोगी, यकीन, अंजाना अंजानी अशा अनेक चित्रपटातून अभिनेत्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ती बॉलीवूडबरोबर तमिळ आणि हॉलीवूडमध्येही काम करत आहे.
प्रियाकां चोप्रा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या शूटिंगच्या ठिकाणचे विविध व्हिडीओ ती शेअर करते. ती तिच्या मुलीचेदेखील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तसेच, तिच्या आईबरोबरचे काही व्हिडीओ शेअर करते. काही वेळा ती आठवणींना उजाळा देते.
प्रियांका चोप्रा कशी घेते तिच्या त्वचेची काळजी?
पती निक जोनासबरोबर जेव्हा ती सुट्ट्यांसाठी विविध ठिकाणी जाते, त्यावेळचे व्हिडीओदेखील लक्ष वेधून घेतात. तसेच तिच्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी ती शेअर करत असते. नुकताच प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या त्वचेची काळजी कशी घेते, हे पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की ती बर्फाच्या पाण्यात तिचे तोंड बुडवत आहे. काही वेळ त्या बर्फाच्या पाण्यात ती तिचा चेहरा तसाच ठेवते. काही वेळानंतर त्या पाण्यातून ती तिचा चेहरा बाहेर काढते. शेवटी ती आईस असे म्हणत असल्याचे ऐकायला येत आहे.
अनेकदा झोपून उठल्यानंतर सकाळी डोळ्यांभोवती सूज दिसते. डोळ्यांभोवती असलेली सूज कमी करण्यासाठी बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवणे हा एक उत्तम उपाय मानला जातो. ज्यामुळे त्वचा नितळ दिसते. चेहऱ्यावरील चमक वाढते, असे म्हणले जाते. प्रियांकानेदेखील अशाच प्रकारे तिच्या त्वचेची काळजी घेतल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले.
दरम्यान, प्रियांका चोप्रा लवकरच, वाराणसी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
