एसएस राजामौली आणि त्यांचा 'आरआरआर' हा चित्रपट जगभर चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. देश-विदेशातील बडे सेलिब्रिटी या चित्रपटाचे कौतुक करताना थकत नाहीत. देसी गर्ल प्रियांका चोप्रा 'RRR' टीमचे कौतुक केले. प्रियांकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून टीमचे अभिनंदन केले होते. मात्र, प्रियांका चोप्रा एका वेगळ्याच कारणाने ट्रोल होत आहे. एका मुलाखतीत प्रियांकाने आरआरआऱ चित्रपटाचा तमिळ चित्रपट म्हणून उल्लेख केला आहे. या उल्लेखानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. डॅक्स शेपर्डच्याआर्मचेअर एक्सपर्ट' या पॉडकास्टमध्ये मुलाखतीदरम्यान प्रियांकाने आरआरआर हा तमिळ चित्रपट असल्याचा उल्लेख केला होता. डॅक्स शेपर्डने आरआरआरला बॉलिवूड चित्रपट म्हणून उल्लेख केला होता. त्याला बरोबर करताना प्रियांकाने तो बॉलिवूड नाही तर तमिळ चित्रपट असल्याचे सांगितले. आरआरआर हा तेलगू चित्रपट आहे. मात्र, त्याला तमिळ चित्रपट म्हणल्याने नेटकऱ्यांनी प्रियांकाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. हेही वाचा- शाहरुख खानच्या मैत्रीमुळेच प्रियांकाला बॉलिवूड सोडावे लागले? कंगनाच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण प्रियांका एसएस राजामौलींच्या आरआरआरची फॅन आहे, जेव्हा हा चित्रपट लॉस एंजेलिसमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा प्रियांकानेही चित्रपटाचे कौतुक केले होते. नंतर, एसएस राजामौली आणि एमएम कीरावानी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत तिने सोशल मीडियावर लिहिले, "या अविश्वसनीय भारतीय चित्रपटाच्या प्रवासात योगदान देण्यासाठी मी काय करू शकते. आरआरआरला शुभेच्छा आणि अभिनंदन." प्रियांका चोप्राने अमेरिकेत 'आरआरआर'च्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून स्क्रिनिंगचे काही फोटो शेअर केले आहेत. प्रियांकाने एसएस राजामौली आणि संगीतकार एमएम कीरावानी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. प्रियंका चोप्राने हे फोटो इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केले आणि लिहिले, 'या अतुल्य भारत चित्रपटाच्या प्रवासात किमान मी इतके योगदान देऊ शकते. आरआरआर, एसएस राजामौली, एमएम कीरावानी, राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण, प्रेम रक्षित (कोरियोग्राफर), काल भैरव (गायक), चंद्रबोस (गीतकार) यांना शुभेच्छा आणि अभिनंदन.' हेही वाचा- “माझा घटस्फोट…” ‘ऊ अंटावा’ आयटम साँगबद्दल समांथाचा मोठा खुलासा; म्हणाली “माझ्या कुटुंबाने…” आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाणं बरंच लोकप्रिय झालं. गोल्डन गोल्ब्स पुरस्कार सोहळ्यात ‘नाटू नाटू’ हे सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं ठरलं आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी गोल्डन ग्लोब्स पुरस्कार मिळाला आहे. तसेच RRR ने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचे शीर्षक देखील जिंकले.