बागेश्वर धामवर लवकरच चित्रपट येणार! ‘या’ निर्मात्याने केली मोठी घोषणा

चित्रपटाद्वारे बागेश्वर धामचे धार्मिक महत्त्व दाखवण्यात येणार

bageshwar-dham
बागेश्वर धामवर लवकरच चित्रपट येणार (संग्रहित छायाचित्र)

आजकाल बागेश्वर धाम या नावाची देशातच नव्हे तर संपूर्ण जगात खूप चर्चा आहे. हजारो भाविक मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गधा गावात असलेल्या बागेश्वर धाममध्ये पोहोचतात. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार भरतो. धामचे महंत धीरेंद्र शास्त्री यांनी पत्रके बनवून लोकांच्या समस्या सांगण्याचा आणि सोडवण्याचा दावा केला आहे.

हेही वाचा- मंदिरात गेल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानचं चोख प्रत्युत्तर; म्हणाली “माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल…”

सनातन धर्माला देशात योग्य स्थान मिळवून देण्याबद्दल धीरेंद्र शास्त्री बोलतात. त्यामुळे बागेश्वर धामकडे लोकांची श्रद्धाही वाढत चालली आहे. आता बागेश्वर धामवर बॉलिवूडचीही नजर पडल्याचे दिसून आले आहे. चित्रपट निर्माते अभय प्रताप सिंग यांनी लवकरच बागेश्वर धामवर चित्रपट बनवण्यास सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, अभय प्रताप सिंह यांच्या या चित्रपटाद्वारे छतरपूर-खजुराहो हायवेला लागून असलेल्या गधा गावात असलेल्या बागेश्वर धामचे धार्मिक महत्त्व दाखवण्यात येणार आहे. बागेश्वर धामवर चित्रपट बनवून त्यांचे मानवतावादी आणि सामाजिक कार्य सिनेमातून मांडण्याचे दिग्दर्शकाने ठरवले आहे. या चित्रपटाच्या पटकथा लेखनापासून ते दिग्दर्शनापर्यंतची सर्व कामे अभय प्रताप सिंग हे स्वतः करणार आहेत. हा चित्रपट APS पिक्चर्सच्या निर्मिती अंतर्गत बनवला जाईल.

हेही वाचा- अनुष्काबरोबरच्या पहिल्या भेटीतच केला होता विचित्र विनोद; खुद्द विराटने सांगितला ‘तो’ किस्सा

काय असेल चित्रपटाचे नाव?

विशेष म्हणजे दिग्दर्शक अभय प्रताप सिंग यांनी चित्रपटाचे शीर्षक ‘बागेश्वर धाम’ असे निवडले आहे. चित्रपट निर्मात्याने आधीच अधिकृतपणे शीर्षक नोंदणी केली आहे. पुढील महिन्यापासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. कास्टिंगचे काम सुरू आहे.

हेही वाचा- एकेकाळी होत्या जिवलग मैत्रिणी, आता एकमेकींचं तोंडही पाहत नाहीत राणी व ऐश्वर्या; सलमान अन् शाहरुख खान ठरलेले निमित्त

चित्रपटात कोण कलाकार असणार

आता या चित्रपटात बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांची भूमिका कोण साकारणार आणि बॉलिवूडमधील कोणते कलाकार दिसणार हे पाहावे लागेल. या चित्रपटाबद्दल मीडियाशी बोलताना अभय प्रताप सिंह म्हणाले की, ‘सध्या मी यावर भाष्य करू इच्छित नाही. या क्षणी मी एवढेच सांगू शकतो की वेगवेगळ्या भूमिकांसाठी बॉलीवूडमधील काही मोठ्या नावांसोबत चर्चा सुरू आहे. लवकरच सर्व दिग्गज कलाकारांची नावेही समोर येणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 18:18 IST
Next Story
मंदिरात गेल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानचं चोख प्रत्युत्तर; म्हणाली “माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल…”
Exit mobile version