‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या चित्रपटाची क्रेझ भारतासह परदेशातही पाहायला मिळाली. प्रेक्षकांची मने जिंकत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना, फहाद फाझिल, सुनील अशा कलाकारांनी काम केले. ‘पुष्पा’चे चाहते या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये ‘पुष्पा: द रुल’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता ‘पुष्पा २’ मध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक सुकुमार सध्या अर्जुन कपूरच्या संपर्कात असून तो या सिक्वेलमध्ये पोलिसाच्या भूमिकेमध्ये दिसू शकतो असे म्हटले जात होते. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये निर्माते नवीन येरणेनी (Naveen Yerneni) यांनी यावर ‘ही एक अफवा आहे’ असे वक्तव्य केले. ते म्हणाले, “तुम्हाला चुकीची बातमी मिळाली आहे. फहाद फाझिल या चित्रपटामध्ये पोलिस अधिकाऱ्याचे पात्र साकारत आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. हैदराबादमध्ये निश्चित केलेले सीन्स शूट झाल्यावर आम्ही उरलेले सीन्स अन्य लोकेशन्सवर जाऊन शूट करणार आहोत”

आणखी वाचा – मुलाच्या पदार्पणासाठी शाहरुख घेतोय मेहनत; या लोकप्रिय लेखकाला प्रशिक्षक म्हणून नेमल्याची चर्चा

मध्यंतरी अभिनेत्री साई पल्लवी ‘पुष्पा २’ मध्ये काम करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तेव्हा निर्माते रवी शंकर यांनी या अफवांचे खंडन केले होते. या चित्रपटामध्ये कोणते नवे कलाकार दिसू शकतात याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड प्रमाणामध्ये उत्सुकता आहे.

आणखी वाचा – “तू चित्रपटाची ताकद…” ‘गॉडफादर’च्या प्रदर्शनानंतर चिरंजीवींनी मानले सलमानचे आभार

अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘पुष्पा १’ मध्ये श्रीवल्ली हे पात्र साकारले होते. तिच्यावर चित्रीत झालेले ‘सामी सामी’ हे गाणं तुफान गाजलं. या चित्रपटामुळे तिला नवी ओळख मिळाली. रश्मिकाने ‘गुडबाय’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. हे कार्यक्रम संपल्यानंतर ती ‘पुष्पा २’ च्या चित्रीकरणासाठी हैदराबादला जाणार आहे.

Story img Loader