शाहरुख खानचा ‘डंकी’ व प्रभासचा ‘सालार’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी येणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. अद्याप ‘सालार’च्या निर्मात्यांनी या गोष्टीची पुष्टी केलेली नाही. पण मीडिया रीपोर्ट आणि काही ट्रेड एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार ‘सालार’च्या निर्मात्यांनी २२ डिसेंबर २०२३ ही तारीख निश्चित केल्याचं समोर येत आहे. याचदिवशी शाहरुख खान व राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ येणार असल्याची चर्चा होत होती.

आता मात्र काही मीडिया रीपोर्टनुसार ‘डंकी’चे निर्माते या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल विचार करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘डंकी’ची भारतातील प्रदर्शनाची तारीख बदलू शकते, पण बाहेरील देशात ‘डंकी’ क्रिसमसच्या मुहूर्तावरच प्रदर्शित होणार हे नक्की आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : Tiger Ka Message : “जब तक टायगर मरा नहीं…” सलमान खानच्या ‘टायगर ३’चा पहिला प्रोमो प्रदर्शित

‘पिंकव्हीला’च्या रीपोर्टनुसार ‘डंकी’ परदेशात २१ डिसेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी यश राज फिल्म्सनी घेतलेली आहे. इतकंच नव्हे तर ‘डंकी’ची काही ठिकाणी टेस्ट स्क्रीनिंगसुद्धा झालेली आहे, अन् ज्यांनी हा चित्रपट पहिला आहे त्यांना तो प्रचंड आवडला असल्याने या चित्रपटाचे निर्माते निर्धास्त आहेत.

‘डंकी’ हा चित्रपट अवैध स्थलांतर या गंभीर मुद्द्यावर भाष्य करणारा आहे, अन् बाहेरील देशात ही खूप मोठी समस्या आहे त्यामुळे बाहेरील देशात हा चित्रपट ठरलेल्या वेळी प्रदर्शित करण्याबद्दल निर्माते ठाम आहेत. परंतु भारतात मात्र हा चित्रपट २१ डिसेंबरच्या आधी प्रदर्शित होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप याबद्दल खुलासा झालेला नाही. ‘डंकी’मध्ये शाहरुख खानसह तापसी पन्नू, सतीश शाह व विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader