Pushkar Shrotri on Deepika Padukone: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लोकप्रिय अभिनेत्री आहे. बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिची ओळख आहे. ओम शांती ओम, पद्मावत, ब्रेक के बाद, चेन्नई एक्स्प्रेस, हॅपी न्यू इयर, बाजीराव मस्तानी, पिकू, जवान, पठाण अशा अनेक चित्रपटांतून दीपिका पादुकोणने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

आता मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीने दीपिका पादुकोणची एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती, त्यावेळी काय अनुभव आला होता, याबद्दल वक्तव्य केले आहे.

पुष्कर श्रोत्रीने अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अभिनेत्याने दीपिकाबद्दल वक्तव्य केले आहे. आता तो नेमकं काय म्हणाला आहे, ते जाणून घेऊ…

Award Banner

“दोन तासांचा वेळ…”

एका सांगीतिक कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करत होतो. त्यावेळी दीपिका पादुकोण तिथे तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनला आली होती. दीपिका पादुकोण मला खूप आवडते. मला ती आजही खूप आवडते.”

पुष्कर श्रोत्री पुढे म्हणाला, “दीपिकानं त्या कार्यक्रमासाठी दोन तासांचा वेळ दिला होता. त्या दोन तासांत तिनं मोबाईल पाहिला नाही किंवा मेकअपही केला नाही. दोन तास ती पूर्णवेळ स्टेजवर काय चाललं आहे, ते बघत होती. प्रश्नांना उत्तरं देत होती. तोडकं-मोडकं मराठी बोलत होती. हिंदीतही बोलत होती. शेवटी तिच्याबरोबर डान्स करायची वेळ आली, तर मी आधीच सांगून ठेवलं होतं की, मला दीपिकाबरोबर कोणत्या गाण्यावर डान्स करायचा आहे. मला तिच्याबरोबर आँखो में तेरी… या गाण्यावर डान्स करायचा होता.

अभिनेता अनुभव सांगत म्हणाला, “गंमत काय झाली की, ती आधीच उंच आणि शिडशिडीत आहे. त्यात तिनं खूप मोठी हिल्सची सँडल घातली होती. म्हणजे मी उड्या मारून डान्स स्टेप्स करत होतो; पण मजा आली.”

पुष्कर श्रोत्री यांनी मराठी टेलिव्हिजन शो, मराठी चित्रपट, तसेच काही मोजक्या हिंदी सिनेमांतही काम केले आहे.

दरम्यान, दीपिका पादुकोण विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.