बॉलीवूडमधील आघाडीचा हिरो म्हणजे मनोज बाजपेयी. ‘सत्या’ चित्रपटात भिकू म्हात्रे नावाचं पात्र साकारून मनोज लोकप्रिय झाले. या चित्रपटात मुंबईच्या गँगस्टरची भूमिका उत्कृष्टपणे साकारल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. आधी लहानमोठ्या भूमिका करणाऱ्या मनोज यांनी या चित्रपटानंतर मागे वळून पाहिलं नाही.

‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘सत्या’, ‘शूल’, ‘सत्यमेव जयते’, ‘सोनचिडिया’, ‘द फॅमिली मॅन’, ‘जोरम’, ‘किलर सूप’ अशा अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात व बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान त्यांनी निर्माण केलं. इंडस्ट्रीतील आउटसायडर असलेले मनोज बाजपेयी फक्त आणि फक्त दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीतील स्टार कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quiz about bollywood actor manoj bajpayee films career web series national awards hrc
First published on: 23-04-2024 at 09:37 IST