R Madhavan Dubai Home Tour video : लोकप्रिय अभिनेता आर माधवनने आपल्या मुलाच्या, वेदांतच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्याच्या स्विमिंग ट्रेनिंगसाठी काही वर्षांपूर्वी दुबईत घर घेतलं. माधवन भारतात काम नसेल तेव्हा दुबईत राहतो. त्याच्या दुबईतील घराचा व्हिडीओ त्याच्या पत्नीने शेअर केला होता. आज आपण आर माधवनच्या दुबईतील घराची झलक पाहणार आहोत.
माधवनने २०२१ मध्ये आपला मुक्काम दुबईला हलवला. कारण त्याचा मुलगा वेदांत हा एक राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आहे. भारतात कोव्हिडच्या काळात मोठे स्विमिंग पूल्स बंद होते, त्यामुळे वेदांतच्या प्रशिक्षणात खंड पडू नये आणि त्याला २०२६ च्या ऑलिम्पिकसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी माधवनने दुबईत राहण्याचा निर्णय घेतला.
माधवनचे घर दुबईतील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या दुबई मरीना (Dubai Marina) परिसरात असल्याचं म्हटलं जातं. हे घर आधुनिक पद्धतीचे असून तिथून दुबईच्या स्कायलाईनचे आणि समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. घराचे इंटिरिअर अतिशय साधे पण आलिशान आहे. मागील दिवाळीत माधवनची पत्नी सरिता बिरजेने या घराचे व्हिडीओ शेअर केले होते. त्यात त्यांनी दुबईतील घरात अतिशय पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले होते.
माधवनची पत्नी सरिता बिरजेने इन्स्टाग्रामवर दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला होता. यात आकर्षक विद्युत रोषणाई, घरातील सजावट, विविध खाद्यपदार्थ दिसत आहे. याच व्हिडीओत त्यांच्या घरी दिवाळीनिमित्त आलेल्या पाहुण्यांचे फोटोही होते.
पाहा आर माधवनच्या घराचा व्हिडीओ
सरिता बिरजे ही मराठी आहे. या व्हिडीओत सरिता पारंपरिक मराठी लूकमध्ये दिसतेय. तिने पैठणी नेसली आहे. तिने व माधवनने दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन केले. तसेच आलेल्या पाहुण्यांसाठी विविध खाद्यपदार्थांची मेजवानीही व्हिडीओत पाहायला मिळते. सरिताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, दुबईत शिफ्ट झाल्यामुळे माधवनने मुंबईतील बीकेसी येथील आपले १७.५ कोटींचे आलिशान अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. या घरातून त्याला दर महिन्याला ६.५ लाख रुपये भाडं मिळतं.
