scorecardresearch

“हे तुझ्याकडून अपेक्षित नाही…” मुस्लिम व्यक्तीबद्दल केलेल्या आर.माधवनच्या जुन्या विनोदावर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

मुस्लिम व्यक्तीबद्दल आणि बहूपत्नीत्वाबद्दल माधवनने केलेला जुना विनोद होतोय पुन्हा व्हायरल

r madhavan
फोटो : इंडियन एक्सप्रेस

अभिनेता आर. माधवन त्याच्या चित्रपटाच्या निवडीच्या विषयामुळे आणि त्याच्या दर्जेदार अभिनयामुळे कायम चर्चेत असतो. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला त्याचा ‘रॉकेट्री – द नांबी इफेक्ट’ हा चित्रपट चांगलाच गाजला. माधवन सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत असल्याने त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होताना दिसत आहे. तो ‘इस्लामोफोबिक’ असल्याचा आरोप लावत नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उद्योगपती हर्ष गोएंका यांनी त्यांच्या एका ट्वीटच्या माध्यमातून माधवनचा एक जुना व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये माधवन एका ठिकाणी भाषण देत आहे, या भाषणादरम्यान माधवनने एक विनोद सांगितला. या विनोदातून त्याने एक मुस्लिम व्यक्ति आणि बहूपत्नीत्व यावर भाष्य केलं आहे. यामुळेच सध्या तो चांगलाच ट्रोल होत आहे.

आणखी वाचा : “मी एकमेव अभिनेत्री…” चित्रपटातील किसिंग व रेप सीन्सविषयी रविना टंडनने सोडलं मौन

व्हिडिओमध्ये माधवन एक विनोदी आणि काल्पनिक गोष्ट सांगताना म्हणाला, “अब्दुल नावाचा एक माणूस एका प्रख्यात डॉक्टरला फोन करतो आणि आपल्या बायकोच्या पोटात प्रचंड दुखत आहे असं सांगतो, मी बायकोला दाखवायला आणू का असं विचारल्यावर तो डॉक्टर त्याला सांगतो की तुम्ही त्यांना घेऊन या, मी त्यांना तपासतो आणि गरजेचा असेल तो उपचार करतो. अब्दुलने त्याच्या परीने बायकोला काय झालं असेल याचे ठोकताळे मांडलेले असतात, तरी डॉक्टर त्याला बायकोला घेऊन यायला सांगतात.”

माधवन सांगतो, “डॉक्टर त्याला दिलासा देत सांगतात की तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन या, बायकोला तपासल्यावर तिला अपेंडिक्स झाल्याचं सांगतात आणि ऑपरेशनचा सल्ला देतात, डॉक्टर ऑपरेशन करतात आणि अब्दुलची बायको बरी होते. एका वर्षाने अब्दुल पुन्हा डॉक्टरांना फोन करतो आणि पुन्हा बायकोच्या पोटात दुखत असल्याचं सांगतो, तुम्ही तिचं पुन्हा अपेंडिक्सचं ऑपरेशन करा ज्याने ती ठीक होईल असंदेखील डॉक्टरांना सांगतो. डॉक्टरांना हे काही पटत नाही, अब्दुलचे वारंवार येणारे सल्ले ऐकून डॉक्टर चिडून त्याला म्हणतात की, अब्दुल मी एक डॉक्टर आहे, आणि कोणत्याही व्यक्तीला केवळ एकच अपेंडिक्स असतो, ज्याचं मी ऑपरेशन आधीच केलं आहे, त्यामुळे मला माझं काम शिकवू नकोस. डॉक्टरांचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यावर अब्दुल म्हणतो, की तुमचं मान्य आहे की मनुष्याला एकच अपेंडिक्स असतो, पण एखाद्या माणसाला २ पत्नी असू शकतात ना?”

व्हिडिओमध्ये माधवनने सांगितलेल्या विनोदावर हशा पिकताना आपल्याला पाहायला मिळतो, पण आता त्याच्या या विनोदामुळे तो ‘इस्लामोफोबिक’ असल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. माधवनचा हा जुना व्हिडिओ आणि त्यातील त्याचा हा विनोद बऱ्याच लोकांना पसंत पडला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. “असे विनोद माधवनकडून अपेक्षित नाहीत” असं बऱ्याच लोकांनी या व्हिडिओखाली कॉमेंट करून ट्वीट केलं आहे. शिवाय हा व्हिडिओ केवळ द्वेषभावना पसरवतो असंही काही लोकांनी ट्वीटमध्ये म्हंटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:18 IST
ताज्या बातम्या