R Madhavan Dhurandhar 2 Theater Video: मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहण्याचा आनंदच वेगळा असतो. आपल्या आवडत्या कलाकारांचे नवीन चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. मात्र, कलाकार स्वत:चाच सिनेमा थिएटरमध्ये पाहत असतील तर?

अलीकडे थिएटरमध्ये सिनेमा सुरू असताना त्यामध्ये काम करणारे कलाकार प्रेक्षकांना भेटण्यासाठी येतात. त्यामुळे प्रेक्षकांना सुखद धक्का बसतो. आता आर. माधवन प्रेक्षकांच्या भेटीला गेला नाही; मात्र त्याने थिएटरमध्ये जाऊन स्वत:चाच चित्रपट पाहिला.

स्वत:चाच सिनेमा पाहण्यासाठी आर.माधवन थिएटरमध्ये पोहोचला

सध्या आर. माधवनची प्रमुख भूमिका असलेला धुरंधर २ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जगभरात एक हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसेच, बॉक्स ऑफिसवरील अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता आर. माधवनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Award Banner

या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, स्क्रीनवर धुरंधर २ या सिनेमातील सीन पाहायला मिळत आहे. कॅमेरा स्क्रीनवरून दुसरीकडे वळवला जातो. तर तिथे आर. माधवन ‘धुरंधर’ सिनेमा पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षय राठीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

तसेच, अभिनेत्याबरोबरचे काही फोटोदेखील त्याने शेअर केले आहेत. त्याच्या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकरी कमेंट्स करीत आर. माधवनच्या फोटोंचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘धुरंधर २’मध्ये आर. माधवनने साकारली आहे ‘ही’ भूमिका

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’मध्ये आर. माधवनने अजय संन्याल ही भूमिका साकारली आहे. या सिनेमातील अभिनेत्याच्या भूमिकेची आणि त्याच्या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

आर. माधवनबरोबरच या सिनेमामध्ये रणवीर सिंह, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, संजय दत्त हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले.

प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारही या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तर, अनेकांनी टीकाही केली आहे. आता आगामी काळात हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे, महत्त्वाचे ठरणार आहे.