Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा तीन दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा अखेर पार पडला. गेल्या तीन दिवसांपासून गुजरातमधील जामनगर येथे सेलिब्रिटींसह उद्योग जगतातील दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. काल, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. यावेळी राधिका मर्चंटची ग्रँड एन्ट्री पाहायला मिळाली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

राधिका मर्चंटच्या ग्रँड एन्ट्रीचा व्हिडीओ ‘विरल भयानी’ या सेलिब्रिटी फोटोग्राफरच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राधिका बेच कलरच्या लेहेंग्यात पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला अंबानींच्या सूनेच्या एन्ट्रीआधी फटाक्यांची आतिषबाजी होताना दिसत आहे. त्यानंतर राधिका एन्ट्री घेते. मग ती ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘देखा तेनु पहली पहली बार वे’ या गाण्यावर डान्स करत अनंत यांच्याकडे येताना दिसत आहे. राधिकाच्या या ग्रँड एन्ट्रीने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Love Sex Aur Dhokha 2 to feature trans woman Bonita Rajpurohit
एकेकाळी १० हजार रुपये महिन्याने करायची काम, आता ट्रान्सवूमन बोनिता एकता कपूरच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!
no affair clause for Yeh Rishta Kya Kehlata Hai
सह-कलाकारांशी अफेअर करता येणार नाही, ‘या’ मालिकेच्या निर्मात्यांनी करारावर घेतली सही, अभिनेत्याने दिली माहिती

हेही वाचा – Video: रणबीर कपूर-आलिया भट्टचा लेकीसह जामनगरहून परतीचा प्रवास, राहाच्या क्यूट अंदाजने वेधलं लक्ष

कालच्या महाआरतीला सर्व पाहुणे पारंपरिक वेशात पाहायला मिळाले. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये शाहरुखची बायको गौरी खान दिसली. तर शाहरुख पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये पाहायला मिळाला.

हेही वाचा – Video: ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेचा सुरू होणार नवा अध्याय, सुमीत पुसावळेच्या जागी बाळूमामांच्या रुपात झळकणार ‘हे’ अभिनेते

दरम्यान, अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडच्या तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले. तिसऱ्या दिवशी, काल सर्व पाहुणे मंडळींना जामनगर व वनतारा फिरवलं आणि रात्री भव्य महाआरती, हस्ताक्षर सेरेमनी झाली. अशा प्रकारे अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा धुमधडाक्यात झाला. आता सर्व पाहुणे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.