scorecardresearch

Premium

राघव चड्ढांनी एन्जॉय केला मोजड्या लपवण्याचा खेळ; मेव्हणींना दिली ‘ही’ महागडी भेटवस्तू

राघव आणि परिणीतीने लग्नाच्या सगळ्या विधी खूप एन्जॉय केल्या

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update
राघव चड्ढा परिणीती चोप्रा लग्न

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा अखेर लग्नबंधनात अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. लग्नानंतर परिणीती आणि राघव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. यामध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.

हेही वाचा- “तुमचं चोप्रा कुटुंबामध्ये स्वागत…”, परिणीती-राघवसाठी प्रियांका चोप्राची खास पोस्ट; म्हणाली…

Atul Rao Heart Stopped Working Six Times Indian Origin Student Alive in London These Story Will Change Your Life Perspective
अतुलचं हृदय सहा वेळा बंद पडलं आणि मग.. भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची लंडनमधील गोष्ट वाचून व्हाल सुन्न!
Rutuja home
“घर घेतल्यावर आता त्याचा EMI…,” ऋतुजा बागवेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली…
shahid-kapoor-kabir-singh
रोज दोन पाकिटे सिगारेट ओढणारा शाहिद कपूर ‘कबीर सिंग’च्या सेटवरून निघताना करायचा ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “माझ्या बाळाला…”
Dubai Lady Makes Scammer Angry By Jugaadu Trick Of Giving Out Wrong Debit Card Number People Amazed By Her Smartness
‘ती’ ने असं काही वेड लावलं की स्कॅमर शेवटी भडकून शिव्याच देऊ लागला; Video पाहून तुम्हीही शिकून घ्या

दरम्यान लग्नामध्ये परिणीती आणि राघव खूप खूष दिसत होते. दोघांनी लग्नाच्या सगळ्या विधी एन्जॉय केल्या. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार मोजड्या लपवण्याच्या खेळात राघव यांनी परिणीतीच्या सगळ्या बहिणींना महागडी भेटवस्तू दिली आहे. राघव यांनी हा खेळ चांगलाच एन्जॉय केला. राघव यांनी त्यांच्या सर्व मेव्हणींना डायमंडचा नेकलेस भेट म्हणून दिला आहे.

हेही वाचा- Video: लग्नानंतर पहिल्यांदाच राघव चड्ढा व परिणीती चोप्रा आले माध्यमांसमोर, व्हिडीओ व्हायरल

गेली बरेच महिने परिणीती व राघवच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच चर्चाही रंगल्या. इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी दोघांना एकत्रित पाहिलं गेलं. मात्र दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. अखेर मे महिन्यात दिल्लीमध्ये साखरपुडा करत त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raghav chadha enjoy joota chupai parineeti chopra husband gave all his salis diamond kalichidis dpj

First published on: 25-09-2023 at 19:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×