Alia – Ranbir Daughter Raha Kapoor : आलिया भट्ट व रणबीर कपूर या दोघांपेक्षा सध्या इंटरनेटवर त्यांच्या लाडक्या लेकीची सर्वाधिक चर्चा चालू असते. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर रणबीर – आलियाने एप्रिल २०२२ मध्ये राहत्या घरी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला फक्त काही निवडक कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या जोडप्याने त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव राहा असं ठेवलं.

मुलीच्या जन्मानंतर पुढे चार ते पाच महिन्यांतच आलिया पुन्हा एकदा कामावर रुजू झाली परंतु, या जोडप्याने राहाचा चेहरा कुठेच रिव्हिल केला नव्हता… तिला सुरुवातीला लाइमलाईटपासून दूर ठेवलं होतं. गेल्यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी पापाराझींसमोर आलिया – रणबीरने लाडक्या राहाला घेऊन पोज दिल्या अन् तेव्हापासून राहा कपूर सर्वांची लाडकी झाली. तिचे हावभाव, चेहऱ्यावरचा गोड अंदाज सगळं काही कॅमेऱ्यात कैद केलं जातं. राहाचा चेहरा दाखवल्यानंतर ती नेमकी कोणासारखी दिसते याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली होती. अनेकांनी राहा एकदम आलियासारखी आहे असं म्हटलं, तर काहींनी राहा तिच्या आजोबांसारखी म्हणजे ऋषी कपूर यांच्यासारखी दिसते असं म्हटलं. यावर आता आलियाची नणंद व रणबीरची लाडकी बहीण रिद्धिमा कपूरने उत्तर दिलं आहे.

balmaifal ganpati prasad
बालमैफल: प्रसाद… डबल डबल!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
article about painting and sculpture by artist kishore thakur zws
कलाकारण : दिसण्यावरची दहशत 
after facing lots of difficulties two come together and become one forever
वर्धा : तो अनाथ, ती दिव्यांग ! प्रेमाच्या आणाभाका आणि कुटुंबाचा विरोध झुगारून शुभमंगल.
actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Loksatta viva Traditions of Ganesh murti jewellery Ganeshotsav 2024
परंपरा गणरायाच्या दागिन्यांची
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?

हेही वाचा : “गणबाई मोगरा गणाची साडी…”, मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर सहानी यूके स्थित रेडिओ जॉकी अनुष्का अरोराला दिलेल्या मुलाखतीत सांगते, “राहा ( Raha Kapoor ) तिच्या आजोबांसारखीच एकदम गुणी बाळ आहे. ती मला ‘बू’ अशी हाक मारते. माझी लेक समारा रणबीरला आधीपासून ‘आरके’ म्हणते. समाराने त्याला अशीच हाक मारावी अशी त्याची आधीपासून इच्छा होती. मी तिला सांगितलं होतं ‘मामू’, ‘अंकल’ अशी हाक मारत जा… ‘मामाजी’ सोडून इतर कोणत्याही नावाने हाक मारत जा… पण, रणबीरच म्हणाला, समारा मला ‘आरके’ अशी हाक मारू शकते. अगदी तसंच आता राहा मला ‘बू’ म्हणते. ती खूपच गोंडस आहे. आम्ही व्हिडीओ कॉलवर बोलतो कारण, मी दिल्लीत आणि राहा मुंबईत राहते. तिला आमच्याकडचा कुत्रा खूप आवडतो. त्याचं नाव किलियन आहे. तिला आता एवढा मोठा शब्द उच्चारता येत नाही. त्यामुळे “किली बू, किली बू” असा आवाज ती फोनवर देत असते.”

हेही वाचा : रेखा यांनी धावत जाऊन जया बच्चन यांना मारली होती मिठी, दोघींनी एकत्र उभे राहून अमिताभ बच्चन यांना…

ranbir
रणबीर कपूर, नीतू सिंग व रिद्धिमा कपूर सहानी ( Raha Kapoor )

राहा कपूर ( Raha Kapoor ) कोणासारखी दिसते?

“राहा कुटुंबातील प्रत्येकासारखी दिसते. सगळ्यांमधले थोडेफार गुण तिच्या आहेत. मला कधी वाटतं ती समारासारखी दिसते पण, समारा दिसण्याच्या बाबतीत अगदी माझ्या भावावर ( रणबीर कपूर ) गेलीये. खरंतर, राहा आलिया आणि माझ्या वडिलांसारखी दिसते. ती माझ्यासारखी अजिबातच दिसत नाही. पण, ती अगदी गोड आणि गुणी बाळ आहे.” असं रिद्धिमा कपूरने राहाबद्दल सांगितलं.