Raha Kapoor Video : बॉलीवूडमधल्या बहुचर्चित स्टारकिड्सपैकी एक आहे राहा कपूर. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टची ही गोंडस लेक नेहमी चर्चेत असते. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होतं असतात. राहाचा गोंडसपणा हा नेहमी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं असतो. अलीकडेच तिचा चालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. राहाला पहिल्यांदाच चालताना पाहून रणबीर-आलियाच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला होता. नुकताच तिचा काका अयान मुखर्जीबरोबरचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. अयान मुखर्जी व राहा कपूरचा ( Raha Kapoor ) व्हिडीओ 'फिल्मीग्यान' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, काका अयान मुखर्जी आणि आई आलिया भट्टसह राहा फिरायला निघाल्याचं दिसत आहे. काळ्या गाडीमध्ये राहा अयान मुखर्जीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. तर बाजूला आलिया भट्ट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमधील राहाच्या गोड अंदाजाने पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली आहेत. हेही वाचा - Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने पायावर काढला नवा टॅटू, पाहा व्हिडीओ राहाच्या ( Raha Kapoor ) या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, "आता राहा खूप मोठी झाली आहे. रणबीर-आलिया हिला काय खाऊ घालता?" तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, "बेबी डॉल." तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, "क्यूटी पाई राहा." पाहा राहा कपूरचा गोड व्हिडीओ ( Raha Kapoor Video ) View this post on Instagram A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan) याआधी अयान मुखर्जी व राहा कपूरचा ( Raha Kapoor ) गाडीतून फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत, निळ्या रंगाच्या गाडीतून राहा काका अयान मुखर्जीबरोबर फिरताना दिसली होती. पांढऱ्या रंगाच्या सुंदर अशा फ्रॉकमध्ये राहा पाहायला मिळाली होती. तसंच या गाडीत राहा एका मोठ्या फुग्याबरोबर खेळताना पाहायला मिळाली होती. हेही वाचा – Devara Part – 1 : ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरचं रोमँटिक गाणं संगीतकाराने केलंय कॉपी? नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “काही वर्षांपूर्वी…” दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट २०२२मध्ये लग्नबंधनात अडकले आणि त्यानंतर त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला राहाचा जन्म झाला. रणबीर-आलियाने आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा चाहत्यांपासून एक वर्ष लपवला होता. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर दोघांनी राहाची पहिली झलक दाखवली. तेव्हापासून राहाचे गोड फोटो, व्हिडीओ सतत व्हायरल होतं असतात.