‘स्कॅम १९९२’सारख्या दमदार वेबसीरिजमुळे प्रतीक गांधी ही नाव प्रत्येकाला परिचित झालं. प्रतीक गांधी या अभिनेत्याला या सीरिजमुळे घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर प्रतीकने बॉलिवूडमध्ये नशीब अजमवायचं ठरवलं पण त्याच्या हाती फारसं काही चांगलं लागलं नाही. आता मात्र प्रतीक बॉलिवूडमधील एका प्रतिष्ठित निर्माते दिग्दर्शकांच्या प्रोजेक्टमधून आपल्या समोर येणार आहे. फरहान अख्तर निर्मित एका नवीन चित्रपटात प्रतीक झळकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्सेल एंटरटेनमेंटच्या आगामी चित्रपटाचे ‘अग्नी’चे चित्रीकरण पूर्ण झाल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली. आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी ‘अग्नी’च्या सेटवरचे काही अविस्मरणीय क्षण शेअर केले आहेत. त्यामध्ये, दिग्दर्शक राहुल ढोलकिया आणि चित्रपटाचे कलाकार प्रतीक गांधी, दिव्येंदू शर्मा, सैयामी खेर आपल्याला बघायला मिळत आहेत. यांच्याबरोबरच सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी सारख्या मराठमोळ्या कलाकारांचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’च्या अडचणीत आणखी वाढ; अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी केली बॉयकॉटची मागणी

‘अग्नी’चे चित्रीकरण पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत सैयामी खेर आणि दिव्येंदू शर्मा यांनीही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. चित्रपटातील कलाकारांबरोबरच, फरहान अख्तरने देखील त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टीमचे अभिनंदन केले. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या ‘अग्नी’ या चित्रपटाची कथा अग्निशमन दल आणि त्यांच्या आव्हानांवर आधारित आहे.

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी त्यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ‘ज़िंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दिल चाहता है’, ‘डॉन’, ‘डॉन २’ सारख्या अनेक सुपरहीट चित्रपटांनी दर्शकांचे मनोरंजन केले आहे. ‘अग्नि’बरोबरच फरहान आपल्या बहिणीच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटावरही काम करत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फरहानच्या ‘दिल चाहता है’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ प्रमाणे ही कथादेखील ३ मैत्रिणींच्या घनिष्ट नातेसंबंधांवर बेतलेली असणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dholakia film agni shooting wrap satrring pratik gandhi saiyami kher sai tamhankar avn
First published on: 07-10-2022 at 16:51 IST