Rahul Roy Love Life : ९० च्या दशकात ‘आशिकी’ चित्रपटातून रातोरात सुपरस्टार झालेला अभिनेता राहुल रॉयचे नशीब महेश भट्ट यांच्या एका चित्रपटाने नशीब पालटले. त्याला एकाच वेळी ६० चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. मात्र, जितकी प्रसिद्धी त्याला मिळाली, तितकं यश त्याला पुढे मिळालं नाही.
अभिनेता राहुल रॉयने ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये नाव कमावले. राहुल रॉयचा जन्म 1968 मध्ये मुंबईत झाला होता. राहुलने ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आणि राहुल रॉय रातोरात सुपरस्टार झाला. या चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत.
सुपरहिट चित्रपट देणाऱ्या राहुलवर एक वेळ अशी आली होती की त्याला कोणीही मोठे चित्रपट ऑफर करत नव्हते. पण नंतर त्याचे नशीब बदलले आणि त्याला एकाच वेळी ६० चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. राहुल रॉय त्याच्या फिल्मी करिअरसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत राहिला. त्याच्या प्रेमप्रकरणांबद्दल जाणून घेऊयात.
राहुल रॉयचं आईबरोबर अफेअर असल्याची अफवा
राहुल रॉयने एका मुलाखतीत एक धक्कादायक प्रसंग सांगितला होता. एकदा तो आपल्या मित्रांबरोबर पार्टी करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. त्याची आईही तिच्या मैत्रिणींबरोबर तिथे पोहोचली होती. माय-लेकाने एकत्र डान्स केला आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी आली की राहुल एका वयस्कर महिलेबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे आणि तो तिच्याबरोबर डान्स करत होता. यावर नाराजी व्यक्त करत राहुल म्हणाला होता की, लोकांनी किमान ती महिला कोण आहे याची खात्री करायला हवी होती.
राहुल रॉयची लव्ह लाइफ
एकेकाळी राहुल रॉयचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत होते. राहुलचे तीन अफेअर होते आणि त्याचा एक घटस्फोट झाला. राहुल रॉयचे अफेअर बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टबरोबर होते. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले. या चित्रपटांच्या माध्यमातून दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते पण काही कारणांमुळे दोघे वेगळे झाले.
राहुल रॉयचं लग्न व घटस्फोट
बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला देखील ‘मजधार’ आणि ‘अचानक’ या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान राहुल रॉयच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर सुमन रंगनाथनही राहुल रॉयबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. यानंतर १९९८ मध्ये राहुल रॉय राजलक्ष्मी खानविलकरला भेटला, दोघांनी २००० साली लग्न केलं. पण १४ वर्षांनी त्याचा घटस्फोट झाला. आता राहुल रॉय एकटाच राहतोय. तो सिनेसृष्टीपासून दूर आहे. त्याचा लूक इतका बदलला आहे की त्याला ओळखणंही कठीण झालंय.
