Raid 2 Box Office Collection Day 4 : बॉलीवूड स्टार अजय देवगण व रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘रेड 2’ चित्रपट गुरुवारी १ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘रेड 2’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या सिनेमाचे ४ दिवसांचे कलेक्शन जाणून घेऊयात.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या सिनेमाचा सिक्वेल असलेल्या ‘रेड 2’चे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. ‘रेड 2’ ची बॉक्स ऑफिसवर संजय दत्तचा ‘भूतनी’, दाक्षिणात्य चित्रपट ‘हिट 3’ व ‘रेट्रो’ तसेच हॉलीवूड चित्रपट ‘थंडरबोल्ट्स’शी टक्कर झाली. मात्र तरीही या सिनेमाने दमदार ओपनिंग करत ४ दिवस चांगले कलेक्शन केले.
‘रेड 2’ चे चार दिवसांचे कलेक्शन किती?
‘रेड २’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी १९.२५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी १२ कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी रितेशच्या या चित्रपटाने १८ कोटींचे कलेक्शन केले. तिन्ही दिवसापेक्षा चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचं दिसून आलं. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटाने रविवारी २१.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ‘रेड २’ चे ४ दिवसांचे एकूण कलेक्शन ७०.७५ कोटी रुपये झालं आहे.
‘रेड 2’ तीन दिवसांत वसूल केले बजेट
‘रेड 2’ चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाने ४ दिवसांत ७० कोटींहून जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने फक्त ३ दिवसांत बजेटची रक्कम वसूल केली. ‘रेड २’ च्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी ४८ कोटी रुपये खर्च केले आहेत. तीन दिवसांत या चित्रपटाने बजेटचा खर्च वसूल केला.
‘रेड 2’ मधील कलाकार
‘रेड 2’ मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक हे कलाकार आहेत.
दरम्यान, ‘रेड 2’ हा २०२५ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांपैकी एक ठरला आहे. ‘रेड 2’ हा चित्रपट २०२५ मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. ‘छावा’ (३३.१० कोटी) आणि ‘सिकंदर’ (२७.५० कोटी) ‘रेड २’ (१८.२५ कोटी) हे यंदाचे सर्वाधिक ओपनिंग करणारे तीन बॉलीवूड चित्रपट आहेत.