Raj Kapoor Nargis Affair: राज कपूर यांच्याबद्दल चर्चा सुरू असली की नर्गिसचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. राज कपूर व नर्गिस प्रेमात होते. १९५८ साली नर्गिस यांनी सुनील दत्तशी लग्न केलं. त्यांच्या लग्नामुळे ‘बॉलीवूडचे पहिले शोमन’ अशी ओळख असलेले राज कपूर यांना मोठा धक्का बसला होता. नर्गिसला राज कपूर यांच्याशी लग्न करायचं होतं, पण ते विवाहित होते आणि नर्गिसला लग्नाचे फक्त आश्वासन देत होते. मधु जैन यांच्या 'द कपूर्स: द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा' या पुस्तकातील माहितीनुसार ब्रेकअपनंतर राज कपूर पत्रकार सुरेश कोहलीला म्हणाले होते, "अख्खं जग म्हणतंय की मी नर्गिसला दुखावलं. पण खरं तर तिनेच माझा विश्वासघात केला." पुस्तकातील माहितीनुसार, “नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केलंय हे कळाल्यावर राज कपूर यांना धक्का बसला आणि ते मित्र आणि सहकाऱ्यांसमोर खूप रडले. राज कपूर यांना ते सहनच झालं नव्हतं. नर्गिसचं लग्न झालंय हे आपण स्वप्न तर पाहत नाही ना यासाठी त्यांनी स्वतःला सिगारेटचे चटके दिले होते. नर्गिस असं करू शकते, यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता," असं पुस्तकात लिहिलं आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे. वडिलांचे प्रसिद्ध अभिनेत्रीशी होते अफेअर, आईला कळालं अन् ती…; खुद्द ऋषी कपूर यांनी केलेला खुलासा नर्गिससाठी रडायचे राज कपूर यानंतर राज कपूर खूप मद्यपान करू लागले. या गोष्टींचा त्यांच्या घरच्यांवरही परिणाम झाला. कृष्णा राज कपूर यांनी लेखिका बनी रुबेनला दिलेल्या माहितीनुसार, “ते रात्री दारूच्या नशेत घरी यायचे… एकदा तर ते आले आणि रडत रडत बाथटबमध्ये जवळजवळ बेशुद्ध पडले. एकामागे एक असेच दिवस जात होते. ते माझ्यासाठी रडत असतील असं मला वाटलं असेल? असं तुम्हाला वाटतं का. नाही. नक्कीच नाही. ते तिच्यासाठी रडत होते हे मला माहीत होतं.” एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, “नर्गिस हे त्यांचे एकमेव खरे प्रेम होते. ते कधीही तिच्याविरुद्ध जाहीरपणे बोलले नाही. त्यांनी तिच्या भावांना दोष दिला की त्यांनी या दोघांना वेगळं केलं. ते अनेकदा एकटे असताना नर्गिसने विश्वासघात केला असं म्हणायचे." श्री 420 मध्ये राज कपूर आणि नर्गिस: (फोटो: एक्सप्रेस आर्काइव्हज) “माझे पती देखणे अन् रोमँटिक आहेत, त्यामुळे…”; नर्गिस यांना स्पष्टच बोलल्या होत्या राज कपूर यांच्या पत्नी नर्गिसने मोरारजी देसाईंचा घेतला होता सल्ला या विश्वासघाताच्या दोन दशकांनंतर राज कपूर यांनी सुरेश कोहलीला याबद्दल सविस्तर सांगितलं होतं. हे सगळं एका आठवड्यापूर्वीच घडलंय असं त्यांना वाटत होतं. पण त्यांनी अनेक वर्षे नर्गिसला नात्यात अडकवून ठेवलं आणि एक दिवस मी तुझ्याशी लग्न करेन असं ते वारंवार म्हणत होते. ती दिवसेंदिवस अस्वस्थ होत होती, कारण तिला पत्नी आणि आई व्हायचं होतं. तिला राज कपूर यांच्याशी लग्न करायचं होतं. पुस्तकातील माहितीनुसार, “नर्गिससाठी लग्नाचे पावित्र्य खूप महत्त्वाचे होते. ती राज कपूर यांच्याशी कायदेशीररीत्या लग्न कसे करू शकेल याबाबत तिने तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांचा सल्ला घेतला होता. राज कपूर हिंदू होते आणि आधीच विवाहित होते." २० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम सुनील दत्त यांनी नर्गिसला चित्रपटाच्या सेटवर लागलेल्या आगीतून वाचवलं होतं. मग ती सुनील यांच्या प्रेमात पडली. १९५८ मध्ये त्यांनी लग्न केलं. राज कपूर व नर्सिग वेगळे झाल्यानंतर कृष्णा राज कपूर यांनी नर्गिसला ऋषी कपूर यांच्या लग्नासाठी आमंत्रित केलं होतं. ऋषी यांनी त्यांच्या खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रात याबद्दल लिहिलं आहे.