कलाक्षेत्रामध्ये आजही दिवंगत सुप्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांचं नाव आदराने घेतलं जातं. १९४० ते १९६०च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. शोमॅन म्हणून ओळख असणाऱ्या राज कपूर यांचे आजही लाखो चाहते आहेत. कामासह ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहीले. राज कपूर व सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांच्या अफेअरच्या चर्चा तर बऱ्याच रंगल्या. या दोघांनी जवळपास १६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज कपूर व नर्गिस खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात होते असं बोललं जातं. पण याव्यतिरिक्त आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीशी राज कपूर यांचं नाव जोडलं गेलं. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, राज कपूर अभिनेत्री वैजयंती माला यांच्या प्रेमात होते. त्यांचं वैजयंती यांच्याबरोबर असलेलं नातं राज कपूर यांच्या पत्नीला समजलं. त्यानंतर या राज कपूर व त्यांच्या पत्नीमध्ये अनेक वाद झाले.

आणखी वाचा – शहरातला फ्लॅट सोडून महाबळेश्वरमध्ये घर बांधत तिथेच स्थायिक झाली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री; आता नवऱ्यासह करतेय शेती, म्हणाली…

राज कपूर यांच्या पत्नी घर सोडून गेल्या होत्या. जवळपास दोन महिने त्या आपल्या घरापासून दूर राहिल्या. ‘संगम’ चित्रपटामध्ये राज कपूर व वैजयंती यांनी एकत्र काम केलं. या चित्रपटामधील या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. त्यावेळी राज कपूर व वैजयंती ही जोडी रुपेरी पडद्यावर सुपरहीटही ठरली. दरम्यान या चित्रपटावेळीच दोघांमध्ये मैत्री झाली.

आणखी वाचा – Video : राखी सावंतने उडवली मलायका अरोराच्या चालण्याची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच राज व वैजयंती यांच्यामधील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तसेच दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. यानंतर राज यांची पत्नी कृष्णा यांना हा संपूर्ण प्रकार समजला. त्यानंतर त्यांचा राग अनावर झाला. मुलांसह त्या हॉटेलमध्ये राहू लागल्या. ऋषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ पुस्तकामध्ये याबाबत भाष्य करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kapoor wife left house for two month when she know about husband affair with vaijayanti mala see details kmd