अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहतो. आता त्याने ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत. राजीवने त्याच्या त्याच्या अलिकडच्या व्लॉगमध्ये बहिणीच्या पैशावर जगत असल्याचं म्हणणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. तसेच ऐशोआरामात आयुष्य जगण्यासाठी सुपरस्टार होण्याची गरज नाही, मी एक यशस्वी उद्योजक आहे आणि त्याने स्वतःसाठी खूप पैसे कमवले आहेत, असंही राजीवने स्पष्ट केलं.

राजीव म्हणाला, “माझा दागिन्यांचा व्यवसाय यशस्वीरित्या चालतोय. मी नशीबवान आहे, की माझ्या वडिलांच्या कंपनीतील एक भाग मला देण्यात आला, कारण ती माझी कंपनी होती. मला खरंतर आयतं मिळालं, पण तसं असलं तरी मला स्वतःला सिद्ध करावे लागले की मी दागिने विकू शकतो. अभिनय असो वा निर्मिती, युट्यूबही मी आता सुरू केले. या सगळ्या गोष्टी माझी आवड आहेत. मी इतरही बरीच काम करतो, मी एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. मी स्वतः खूप पैसे कमवले आहेत आणि मला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे.”

राजीव सेन त्याच्या आईबरोबर राहतो. त्याबद्दल त्याला विचारण्यात आलं, त्यावर तो म्हणाला, “जर माझ्या आईने मला कधी घरातून निघून जा, असं सांगितलं तर मी तेही करेन आणि कदाचित रस्त्यावर असेन.”

खरं असेल तरी तुम्हाला काय अडचण आहे? – राजीव सेन

राजीव ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “एक क्षणासाठी असं गृहीत धरा की मी एक खूप ऐशोआरामात आयुष्य जगत आहे, माझी आई दर महिन्याला चेकवर सही करून मला देते, माझे बाबा मला पैसे देतात, माझी बहीण मला चेक (पैसे) देते आणि मला आयुष्य भरभरून जग, असं सांगतात. जर हे खरं असेल तरी तुम्हाला काय अडचण आहे? तुमची स्वतःची १० रुपयांचीही किंमत नाही.”

पत्नी व मुलीबद्दल राजीव म्हणाला…

राजीवने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी चारू असोपा व मुलगी झियाना यांना आर्थिक मदत न करण्यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं दिली. “हे माझे वैयक्तिक आयुष्य आहे. मी राजीव सेन आहे आणि मला वाटत नाही की मला हे सर्व कोणालाही यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याची गरज आहे,” असं राजीव म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीव सेनचे लग्न टीव्ही अभिनेत्री चारू असोपा हिच्याशी झाले होते. या जोडप्याला झियाना नावाची मुलगी आहे. या जोडप्याचा २०२३ मध्ये घटस्फोट झाला. आता ते वेगळे राहतात. दोघेही बरेचदा एकमेकांवर टीका करत असतात.