Rajeev Siddhartha on relationship with Kirti Kulhari: अनेकदा कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळत असते. कलाकार विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत लक्ष वेधून घेतात. आता अभिनेता राजीव सिद्धार्थ व अभिनेत्री कीर्ती कुल्हारी चर्चेत आले आहेत.
राजीव सिद्धार्थ आणि कीर्ती कुल्हारी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर एकमेकांबरोबर फोटो शेअर करत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे सांगितले नव्हते. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजीवने तो आणि कीर्ती गेल्या दीड वर्षापासून एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आहे.
“आम्ही योग्य वेळी एकमेकांना भेटलो…”
राजीव आणि कीर्ती पहिल्यांदा २०१७ मध्ये प्राइम व्हिडीओवरील ‘फोर मोअर शॉट्स प्लीज!’च्या सेटवर भेटले होते. त्यानंतर बराच काळ त्यांच्यात फक्त मैत्री होती. २०२५ मध्ये या सीरिजचा शेवटचा सीझन प्रदर्शित झाला. त्यावेळी ते पुन्हा भेटले, त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली.
राजीवने नुकतीच ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाला, “आम्ही योग्य वेळी एकमेकांना भेटलो. त्याआधी आम्हाला आपापल्या आयुष्यातील प्रवास पूर्ण करायचा होता.”
सोशल मीडियावर फोटो शेअर करण्याबद्दल ते म्हणाले, “आम्हाला एखादी गोष्ट शेअर करावीशी वाटली, तर आम्ही ती शेअर करतो. शेवटी आम्हाला इतरांप्रमाणेच सामान्य आयुष्य जगायचं आहे. लोकांना वाटू शकतं की एखाद्या अभिनेत्याचे आयुष्य कसे आहे, हे ते समजू शकतात. पण, एका कलाकारालाच माहीत असतं की आमचं आयुष्य किती अनिश्चित, उत्साही आणि बऱ्याचदा कठीण असू शकते. आम्हाला अध्यात्म व अभिनय या दोन गोष्टींनी एकमेकांशी जोडले आहे. आमच्या बोलण्यात या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात.”
कीर्तीबरोबर गेल्या दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगत राजीव म्हणाला की आम्ही एकमेकांचा आदर करतो. तो म्हणतो, “मी तिचा सल्ला मागितला तर ती मला देते आणि तीही माझ्याकडे सल्ला मागते. माझी थिएटरची पार्श्वभूमी आहे. मी सतत पाठांतर करत असतो. अगदी गाडी चालवताना, चालताना किंवा बाजारात असतानाही मी माझ्या ओळींचा सराव करत असतो. कधी कधी ती मला थोडा आराम कर असं सांगते, मी तिचं ऐकतो.तुम्ही दुसऱ्या व्यक्तीमध्ये पूर्णत्व शोधू शकत नाही. आधी तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण असायला हवं आणि कदाचित त्यानंतरच तुमच्यासाठी योग्य व्यक्ती तुम्हाला भेटू शकते.”
कीर्ती कुल्हारीने जानेवारी २०२६ मध्ये इन्स्टाग्रामवर राजीवबरोबरच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर दोघंही
एकमेकांबरोबरचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. तर राजीव अद्याप अविवाहित आहे.
