दिवंगत राजेश खन्ना एकेकाळी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांना सुपरस्टार अशी उपमाही दिली जायची. त्यांच्या पत्नी डिंपल कपाडिया व लेक ट्विंकल खन्नासुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रीय होत्या. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जावई अक्षय कुमारसुद्धा या क्षेत्रात काम करणारा लोकप्रिय अभिनेता. यामुळे एकदा त्यांनी ट्विंकलला अक्षय खन्नाबद्दल एक गोष्ट सांगत त्याला नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला होता.
राजेश खन्ना यांचा एक जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांचा जावई आणि अभिनेता अक्षय कुमारबद्दल बोलताना दिसत आहेत. “या वयातही अक्षय खूप हेरा फेरी करतो” असं ते यामध्ये म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी त्यांची मुलगी, अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाला दिलेल्या सल्ल्याबद्दलही भाष्य केलं होतं.
जावई अक्षय कुमारबद्दल राजेश खन्नांनी केलेलं वक्तव्य
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये राजेश खन्ना म्हणताना दिसत आहेत की, “या वयात आमचा जावईराजा खूप गातो. कधी तो भूल भुलैया करतो, कधी हेरा फेरी करतो, तर कधी हेरा फेरी २ करत राहतो. खूप हेरा फेरी करतो. तो आहेच हेरा फेरीवाला माणूस.” ते पुढे म्हणाले, “मी माझ्या मुलीलाही सांगितलं आहे. मी तिला म्हटलं, टीना जरा त्याच्या जिभेला आवर घाल, पण इतकाही नको की त्रास होईल”.
Superstar Rajesh Khanna about his son in law Akshay once upon a time.pic.twitter.com/1eQM9CUWrC https://t.co/p8xYWemFbG
— Abhishek (@vicharabhio) August 10, 2026
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची एका मित्राच्या पार्टीत पहिल्यांदा ओळख झाली होती, असं म्हटलं जातं. त्यानंतर ‘इंटरनॅशनल खिलाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी १७ जानेवारी २००१ रोजी लग्न केलं. जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडलं. अक्षय आणि ट्विंकल आता दोन मुलांचे पालक आहेत. त्यांच्या लग्नाला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
अक्षय कुमारने त्यादरम्यान बायकोसाठी पोस्ट शेअर केली होती. अक्षय व ट्विंकल दोघेही नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. बॉलीवूडमधील दोघे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत.
