scorecardresearch

राजेश खन्ना-डिंपल यांनी तब्बल २७ वर्षे वेगळं राहूनही घेतला नाही घटस्फोट, सनी देओल होता त्यामागचं कारण?

राजेश खन्ना स्वतःपेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केलं होतं

राजेश खन्ना-डिंपल यांनी तब्बल २७ वर्षे वेगळं राहूनही घेतला नाही घटस्फोट, सनी देओल होता त्यामागचं कारण?
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा आज जन्मदिन. २९ डिसेंबर १९४२ रोजी जन्मलेल्या राजेश खन्ना यांनी सलग एक-दोन नाही तर तर तब्बल १७ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. राजेश खन्ना यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच त्याचं खासगी आयुष्यही बरंच चर्चेत राहिलं. त्यांनी वयाने स्वतःपेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल…

डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांनीची पहिली भेट डिंपल यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करायच्या अगोदरच झाली होती. दोघंही अहमदाबादच्या एका स्पोर्ट्स क्लबमध्ये पहिल्यांदा भेटले होते. हिमांशू भाई व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार ७० च्या दशकात राजेश खन्ना नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी राजेश यांनी डिंपल आवडल्या होत्या आणि तिथेच दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली.

आणखी वाचा-डिंपल कपाडिया यांनी अक्षय कुमारला घातली होती ट्विंकलबरोबर लिव्ह इनमध्ये राहण्याची अट, कारण…

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी १९७३ साली लग्न केलं. त्यावेळी राजेश खन्ना डिंपल यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर जवळपास ११ वर्ष डिंपल कोणत्याही चित्रपटात दिसल्या नाहीत. त्यांनी मोठ्या पडद्यावरून ब्रेक घेतला. दरम्यानच्या काळात त्यांच्या मुलं ट्विंकल आणि रिंकी यांचा जन्म झाला. डिंपल यांनी चित्रपटात काम करायचं होतं मात्र राजेश खन्ना यांचा याला विरोध होता. याच कारणाने काही काळानंतर राजेश आणि डिंपल यांच्या वाद होऊ लागले आणि लग्नानंतर ९ वर्षांनी दोघं विभक्त झाले. डिंपल कपाडिया राजेश खन्ना यांना सोडून आपल्या वडिलांच्या घरी राहू लागल्या. पती राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर २ वर्षांनी ‘सागर’ चित्रपटातून डिंपल यांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. त्यानंतर त्या बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसल्या.

आणखी वाचा- “…अन् दिग्दर्शकाने मला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली”, नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

जेव्हा डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना वेगवेगळे राहू लागले आणि डिंपल यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं तेव्हा त्यांची सनी देओलशी जवळीक वाढल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरू झाल्या होत्या. दोघंही ११ वर्षं एकमेकांसोबत होते. डिंपल यांना सनी देओलशी लग्न करायचं होतं पण तो विवाहित होता. आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन डिंपल यांच्याशी लग्न करायला तो तयार नव्हता. त्यामुळे तब्बल २७ वर्षं राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं राहूनही डिंपल यांनी त्यांना घटस्फोट दिला नाही असं बोललं जातं. राजेश खन्नाच्या निधनाआधी अखेरचा काळ डिंपल त्यांच्यासोबत होत्या. १८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 12:53 IST

संबंधित बातम्या