When late Rajesh Khanna rejected Bigg Boss offer : सुपरस्टार राजेश खन्ना यांचे सुपरहिट चित्रपट आणि त्यानंतर करिअरला लागलेली उतरती कळा सर्वश्रूत आहे. ते त्यांच्या काळातील लोकप्रिय अभिनेते होते, पण कालांतराने मात्र त्यांना सिनेमे मिळणं कमी झालं. त्यांच्या अहंकारी स्वभावामुळे निर्माते त्यांच्याबरोबर काम करणं टाळायचे असं म्हटलं जातं. पण तरीही त्यांची लोकप्रियता कमी झाली नव्हती, रिपोर्ट्सनुसार, त्यांना टीव्हीवरील वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉसची ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी ती नाकारली होती. नंतर जेव्हा ते हा शो करायला तयार झाले तेव्हा शोच्या निर्मात्यांनी नकार दिला होता.

राजेश खन्ना यांच्याबद्दल डिंपल कपाडिया बऱ्याचदा बोलतात. त्यांचा स्वभाव, त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से त्यांच्याशी संबंधित लोक सांगतात. २०१२ मधील रेडिफच्या एका लेखानुसार, सिनेपत्रकार अली पीटर जॉन यांनी राजेश खन्ना यांच्याबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यात बिग बॉसच्या ऑफरचाही उल्लेखही आहे. करिअरला उतरती कळा लागल्यावरही राजेश खन्ना यांनी या शोची खिल्ली उडवली होती, असं त्यात म्हटलं होतं.

१५ ऑगस्टमुळे मोठा वीकेंड, पण तुमचा प्लॅन ठरत नाहीये? घरीच OTTवर पाहा या कलाकृती

“एकदा बिग बॉसच्या निर्मात्यांनी मला राजेश खन्ना यांच्याबरोबर मीटिंग फिक्स करण्यासाठी फोन केला होता. पण राजेश खन्ना म्हणाले होते, ‘नाही. राजेश खन्ना असे शो करणार नाही.’ मी त्यांची मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न केला पण ते शो करायला तयार झाले नाहीत. कलर्स टीव्हीने मला सांगितलं की ते खन्ना यांना एका एपिसोडसाठी साडेतीन कोटी रुपये देतील, पण तरीही त्यांनी नकार दिला होता. नंतर काही दिवसांनी राजेश खन्ना यांनी मला फोन केला आणि शो करायचा असल्याचं सांगितलं. पण तेव्हा कलर्सला (निर्मात्यांना) त्यांना शोमध्ये घेण्यात काहीच रस नव्हता,” असं अली पीटर जॉन यांनी सांगितलं.

“५ महिन्यांपूर्वी बाबा होतास, आता कोण झालास!” विकी कौशलला सॅम मानेकशॉ यांच्या मुलीने केला मेसेज; अभिनेता म्हणाला…

२०१० पासून बिग बॉस हा शो सलमान खान होस्ट करत आहे, पण या शोचा तिसरा सीझन राजेश खन्ना यांचे प्रतिस्पर्धी महानायक अमिताभ बच्चन यांनी होस्ट केला होता. अमिताभ बच्चन यांच्यामुळे खन्ना खूप असुरक्षित होते. त्यांनी अमिताभ यांचं लग्न होण्याआधी जया यांच्याबद्दल वाईट गोष्टी पसरवल्या होत्या, तसेच त्या सेटवर आल्या की ते दुर्लक्ष करायचे, असंही अली पीटर जॉन यांनी म्हटलं होतं.

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

राजेश खन्ना यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी अली पीटर जॉन त्यांना भेटले होते तेव्हा काय झालंय असं विचारल्यावर “जर गालिब दारू पिऊन मरू शकतो तर मी का नाही?” असं उत्तर खन्ना यांनी दिलं होतं.