बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. शाहिद बालपणीची ११ वर्षं त्याचे सावत्र वडील राजेश खट्टर यांच्याबरोबर राहत होता. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत राजेश खट्टर यांनी शाहिद कपूरच्या बालपणीच्या क्रशबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : “कोहली आज तो रन बना लै…” भर कार्यक्रमात अनुष्का शर्माने नवऱ्याची उडवली खिल्ली; उत्तर देत विराट म्हणाला…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

राजेश खट्टर म्हणाले, “शाहिद नऊ वर्षांचा असताना एका मुलीच्या प्रेमात होता. ती मुलगी त्याच्या शाळेत होती, तेव्हा शाहिदने त्या मुलीचा फोटो काढून घरी आणून ठेवला होता. शाहिदची उत्सुकता पाहून तो त्या मुलीबरोबर लग्न करेल असेच मला वाटले होते. तेव्हा माझी पत्नी नीलिमाने मला शांत करून समजावले की, या फोटोने काहीही होत नाही पुढे गोष्टी बदलतात, परंतु माझ्या मनात वेगळाच विचार सुरू होता. शाहिद एवढा चांगला दिसतो, ती मुलगी नेमकी कोण असेल? मी नेहमी हाच विचार करीत असायचो.”

हेही वाचा : सलमान की शाहरुख कोणाला निवडशील? आमिर खान उत्तर देत म्हणाला, “भाई तो कभी डूबेंगे नही…”; ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

शाहिद कपूरच्या अभ्यासाबाबत सांगताना राजेश खट्टर म्हणाले, “शाळेत असताना तो फारसा हुशार विद्यार्थी नव्हता. पण, डान्सच्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी शाहिदने मेहनत घेऊन ८० गुण प्राप्त केले होते.”

हेही वाचा : सौरव गांगुलीच्या बायोपिकची चर्चा; आता रणबीर कपूरऐवजी ‘या’ अभिनेत्याची लागू शकते वर्णी!

दरम्यान, शाहिद कपूर त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दमदार अ‍ॅक्शन आणि फायरिंग करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना रोमॅंटिक हिरो, चॉकलेट बॉय याव्यतिरिक्त शाहिदचा एक वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ओटीटी माध्यमावर ९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी अ‍ॅपवर तुम्ही हा चित्रपट विनामूल्य पाहू शकता. लवकरच शाहिद, अभिनेत्री क्रिती सेनॉनबरोबर एका रोमॅंटिक चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.

Story img Loader