अभिनेते राजेश खट्टर यांनी मुलगा ईशान खट्टर, त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी नीलिमा अझीम व त्यांचा मुलगा शाहीद कपूर यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल भआष्य केले. आपण स्वतःला चांगला पिता समजतो. २००१ मध्ये नीलिमापासून विभक्त होण्यापूर्वी शाहीदने त्याच्या तरुणपणाचा बहुतांश काळ सावत्र वडील राजेश आणि आई नीलिमा यांच्यासोबत घालवला होता.

अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभबद्दल माहितीये का? बिग बींच्या मैत्रिणीशीच केलंय लग्न; जाणून घ्या कुठे राहतं कुटुंब

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत राजेश खट्टर यांनी सांगितलं की ईशानचं त्याचा भाऊ युवानशी छान बाँडिंग आहे. युवानच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी ईशान रुग्णालयात भेटीसाठी आला होता. पण शाहीद कपूर अद्याप युवानला भेटलेला नाही. तसेच आपणही त्याची मुलं मीशा आणि झैन यांना कधी भेटलेलो नाही.

२५ लाखांसाठी दोन प्रश्न अन् तीन लाइफलाइन; तरीही ‘कोण होणार करोडपती’च्या स्पर्धकाने सोडला खेळ; तुम्हाला माहितीये का उत्तर?

ईशान व युवानच्या नात्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “त्यांचं नातं छान आहे. दोघांच्या वयात खूप फरक आहे, तो ईशानसाठी लहान मुलासारखा आहे. त्याला तो ‘छोटे’ म्हणतो. ईशान सध्या खूप व्यग्र आहे, तो एका महिन्यापेक्षा जास्त काळ झाला, घरापासून दूर आहे आणि तो आणखी एक महिना परत येणार नाही, त्यामुळे त्यांना जास्त वेळा भेटता येत नाही.”

दरम्यान, ईशान सार्वजनिकरित्या राजेश खट्टर यांना उल्लेख फार कमी करतो. त्याबद्दल राजेश म्हणाले की मीडियामध्ये काय इंप्रेशन पडतं, ते ईशानसाठी महत्त्वाचं नाही. मी त्याच्यापासून फक्त एक फोन कॉल दूर असतो. शिवाय मी स्वतःला ईशान, शाहिद आणि युवानचा चांगला पिता म्हणू शकतो, असंही त्यांनी म्हटलंय.