‘स्त्री २’ ने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती ‘स्त्री’च्या दुसऱ्या भागाला दिली आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या केमिस्ट्रीला भरभरुन पसंती देत आहेत. अवघ्या दोन आठवड्यातच या चित्रपटाने तब्बल ५०० कोटींचा टप्पा पार करत सर्वाधिक कमाई केली आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजकुमार रावने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट

राजकुमारने सांगितला सेटवरचा ‘तो’ किस्सा

राजकुमार रावने ‘स्त्री २’ च्या सेटवरील काही फोटो पोस्ट केले असून हे दोन्ही फोटो स्त्री वेशातील आहेत. या फोटोत राजकुमारने लाल रंगाचा टॉप आणि त्यावर सोनेरी रंगाचं जॅकेट तर शिमरी स्कट घातला आहे. त्याच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती मिळत आहे.फोटोंना कॅप्शन देत त्याने शूटिंग दरम्यानची एक आठवण सांगितली आहे. राजकुमार म्हणाला की, “मी जे फोटो पोस्ट केले आहेत ते फोटो या चित्रपटातील माझ्या सगळ्यात आवडत्या सीनमधले आहेत. मात्र काही कारणांमुळे हा सीन चित्रपटातून वगळण्यात आला. तुम्हाला हा सीन चित्रपटात पाहायला आवडेल का ?” असा प्रश्न त्याने चाहत्यांना विचारला आहे.त्याचबरोबर तृप्ती डिमरी, मानुषी छिल्लर, विजय गांगुली आणि भुमी पेडणेकर या कलारांनी त्याच्या कमेंट करत त्याच्या या लुकचं कौतुक केलं आहे. निमरत कौर या अभिनेत्रीने राजकुमारच्या या फोटोंवर ‘बिकी प्लीज’ अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा – Kangana Ranaut : “..तर कंगना रणौत यांचा शिरच्छेद करु”, धमकीचा व्हिडीओ मेसेज आल्याने खळबळ

‘स्री२’ च्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत राजकुमारने चित्रपटाच्या यशाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. राजकुमार म्हणाला होता की, “स्त्री’चा पहिला भाग जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हापासूनच या चित्रपटाचा वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला आहे. जसं दुसऱ्या भागाला प्रतिसाद मिळत आहे तोच प्रतिसाद चित्रपटाच्या पहिल्या भागातील गाणी, संवाद आणि व्यक्तिरेखांना चाहत्यांनी दिला होता. त्यामुळे एक अभिनेता म्हणून मला माहीत होतं की, चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील. मात्र ज्या प्रकारे’ स्त्री २’ बॉक्स ऑफिसवर सलग दुसऱ्या आठवड्यातही विक्रमी कमाई करत आहे ते आमच्या अपेक्षेपेक्षा ही सर्वात जास्त मिळालेलं यश आहे. या वर्षातला सगळ्यात स्त्री २ सुपरहिट ठरत आहे याचा अतिशय आनंद होत आहे”.

Story img Loader