बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच याचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला.

गांधी हत्येच्या सीननंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल ९ वर्षांनी पुनरागमन करत आहेत.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
Ankita lokhande did not charge any fees for doing Swatantra Veer Savarkar
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटासाठी अंकिता लोखंडेने किती मानधन घेतलं? निर्माता खुलासा करत म्हणाला…

आणखी वाचा : Video : ‘पठाण’च्या गाण्यावर हॉट बिकिनीमध्ये नम्रता मल्लाचा सेक्सी डान्स; चाहते म्हणाले “दीपिकापेक्षा…”

नुकतंच त्यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या चित्रपटाच्या कथेबद्दल संकल्पनेबद्दल तसेच गांधी आणि गोडसे या दोन विचारधारांबद्दल विस्तृतपणे भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये जेव्हा नथुराम गोडसे यांची बाजू नीट लोकांपर्यंत पोहोचली आहे की नाही असा प्रश्न केला गेला, त्यावर राजकुमार संतोषी यांनी उत्तर दिलं.

संतोषी म्हणाले, “गोडसेच्या बचाव भाषणातील काही मुद्देच लोकांपर्यंत पोहोचले आहेत पण ते एकांगी होते. या चित्रपटात गांधीजी आणि गोडसे यांच्यातील संभाषण तुम्हाला पाहायला मिळणार आहे, दोघेही एकेमएकांसमोर स्वतःची बाजू मांडताना दिसणार आहेत, मुळात त्यांना आजवर ही संधी कुणीच दिली नाही. यामुळे हा चित्रपट नक्कीच लोकांना विचार करायला भाग पाडेल.”

पुढे भगत सिंह यांच्या एका वाक्याचा दाखला देत राजकुमार संतोषी म्हणाले, “भगत सिंह यांनीसुद्धा एक गोष्ट सांगितली की अंधपणे एखाद्याच्या मागे चालत राहणं हीसुद्धा एक प्रकारची गुलामी आहे. ही अंधभक्ती मला सध्या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. ‘गांधीजी की जय’ किंवा ‘गोडसे की जय’ म्हणणारे त्यांचे समर्थक कदाचित त्यांची बाजू नीट समजून घेण्यात असमर्थ ठरले आहेत असं मला वाटतं. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक गांधीजींचाही सन्मान करतील आणि गोडसेचाही सन्मान करतील, फक्त फरक हा असेल की लोक त्यांची बाजू समजून घेऊन निर्णय घेतील. अंधपणे त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. चित्रपटा या दोघांचीही हीच बाजू सचोटीने मांडायचा आम्ही प्रयत्न केला आहे.”

राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने एकही बदल न सुचवता प्रमाणपत्र दिलं आहे. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’शी याची टक्कर होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.