Rajpal Yadav Bail Hearing Updates: अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार तुरुंगात आहे. सात चेक-बाउन्स प्रकरणांमध्ये थकबाकी परत करण्यासाठी राजपाल यादवने अतिरिक्त वेळ मागितला होता, पण ती विनंती दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आणि त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं. अखेर राजपालने आत्मसमर्पण केलं आणि सध्या तो तुरुंगात आहे. या प्रकरणात राजपालवर अंदाजे ९ कोटी रुपयांचे कर्ज आहे.
१२ फेब्रुवारी रोजी राजपाल यादवच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी झाली. तेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाने तक्रारदाराला अर्जाचे उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणीसाठी १६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली होती. या प्रकरणी आज सुनावणी झाली आणि १८ मार्चपर्यंत राजपाल यादवला जामीन मंजूर करण्यात आला.
राजपाल यादव चेक बाउन्स प्रकरण सुनावणी लाइव्ह अपडेट्स
राजपाल यादवला जामीन मंजूर
अभिनेता राजपाल यादवला त्याच्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं की प्रतिवादीच्या बँक खात्यात १.५ कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा करण्यात आला आहे. यानंतर न्यायालयाने राजपालचा पासपोर्ट परत करण्याचे निर्देश दिले असून चेक-बाउन्स प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्च रोजी ठेवली आहे.
१.५ कोटी रुपये भरण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला
बार अँड बेंचने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने दुपारी ३ वाजेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. राजपालने १.५ कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे, त्यापैकी २५ लाख रुपये सध्या त्याच्याकडे आहेत आणि ७५ लाख रुपये आधीच दिले गेले आहेत, असं न्यायालयात सांगितलं. उच्च न्यायालयाने डिमांड ड्राफ्ट (डीडी) तयार करून न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणी दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे आणि जर राजपाल यादव तोपर्यंत रक्कम आणू शकला, तर उच्च न्यायालय त्यांना अंतरिम जामीन देण्याचा विचार करू शकते.
पैसे नसल्याचं राजपाल यादवचं वक्तव्य
राजपाल यादव आत्मसमर्पण करायला गेला, तेव्हा माझ्याजवळ पैसेच नाही, तर मी काय करू? असं पोलिसांना म्हणाला होता.
राजपाल यादवला बॉलीवूडमधून मदतीचा हात
सलमान खान, सोनू सूद, वरूण धवन, अजय देवगण हे राजपाल यादवच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
राजपाल यादवची प्रकृती कशी आहे?
राजपाल यादव तुरुंगात आहे. त्याची प्रकृती ठिक आहे, अशी माहिती त्याच्या पत्नीने दिली.
राजपाल यादवची तुरुंगातून सुटका कधी होणार? प्रकृती कशी आहे? पत्नी राधाने दिली माहिती, म्हणाली...

9 कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादव तुरुंगात आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
