अभिनेत्री राखी सावंतच्या आईचं २८ जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर या आजाराशी झुंज देत होत्या. पण आता आईच्या निधनानंतर राखीवर नवं संकट आलं आहे. पुन्हा तिने पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नवऱ्याचं अफेअर असल्याचंही राखीने सांगितलं.
राखीने गंभीर आरोप केल्यानंतर आदिलने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. आदिल कामानिमित्त बाहेर गेला असता पापाराझी छायाचित्रकारांनी त्याला घेरलं. यावेळी आदिलला राखीने केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्याने फारसं स्पष्टीकरण न देता एका वाक्यात उत्तर दिलं.
विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आदिल म्हणाला, “राखीने घरातील भांडणं घरातच ठेवली पाहिजे.” आदिलने यापुढे या वादावर बोलणं टाळलं. पण राखी अजूनही आदिलबाबत प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिसत आहे. आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर आहे. तसेच आदिल व त्या मुलीचे व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकीही राखीने दिली.
राखी म्हणाली, “आता माझी आईच नाही तर यापुढे कोणतीही गोष्ट गमवल्याचं मला दुःख होणार नाही. मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये जेव्हा दीड महिना होती तेव्हा त्याचा तू गैरफायदा घेतला आहेस. आता मी त्या मुलीचं नाव सांगत नाही. पण वेळ आल्यावर मी त्या मुलीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करणार.” आता राखी व आदिलचा हा वाद कितपत वाढणार हे पाहावं लागेल.